दहिसर हे दक्षिण मुंबईच्या उपनगरातील एक शहर आहे. ह्या शहराचा विकसनशील शहरात समावेश केला जातो.व्यापार,व्यवसाय,दळण-वळण,शिक्षण या बाबतीत जरी परीपूर्णता दिसून येत असली तरी शहरातील लोकांना मनोरंजनासाठी इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते. दहिसर शहरात मनोरंजनाची संस्कृतीत साधने म्हणून एकच सिनेमागृह अस्तित्वात आहे.घरे, रस्ते, बाजारपेठ, इमारती, सांड- पाण्याची व्यवस्था पाहून नगरांच्या विकास होत आहे. असे दिसून येते. शहरातील लोकांची मोठी संख्या उदरनिर्वाहासाठी मुंबईतील अनेक शहरांवर अवलंबून असल्याचे दिसून येते . मुंबई शहरापासून दूर असल्यामुळे या शहराची किमंत जास्त मोठ्या प्रमाणात वाढली नाही. मध्यम वर्गातील मोठी संख्या शहर सामावून घेण्यास भक्कम आहे. शहरात शांती नगर, आंबेवाडी, शिवाजी मैदान अशा अनेक ठिकाणी गलिच्छ वस्त्या अस्तित्वात आहे. अशा वस्त्यातील लोक समुदाय आकाराने लहान सदस्य संख्या कमी कुठे जास्त असे विभक्त कुटुंब अस्तित्वात आहे, शहरात पटेल नगर सर्वात जुनी वस्ती आहे व येथे मोठ्या प्रमाणात इमारती दिसून येतात. दहिसर शहरातील चुनाभट्टी भागात मोठ्या प्रमाणात हस्त उद्योग तसेच मोठे व्यवसाय चालतात. पूर्वी येथे हिऱ्याची चकाकी देण्याचा व्यवसाय चालत होता परंतु भारत सरकारने हिऱ्यावर कर लावल्यानंतर हा व्यवसाय बंद पडून त्याजागी अनेक लहान मोठे व्यवसाय स्थापन झाले. चुनाभट्टी भागात अनेक जाती धर्माचे श्रमिक आपणांस राबताना दिसून येतात. हे श्रमिक विभिन्न प्रदेशातून आलेले आहे, त्याचात भाषा, आचार - विचार यात विविधता दिसून येते. येथील लोकांचे सामायिक समूह विकसित दिसत नाही. तसेच या लोकांमध्ये एकरूपता व जवळीक दिसून येत नाही. लोकांच्या अशा वागण्यात विविधता जरी दिसून येत असली तरी धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक या बाबतीत मोठ्या प्रमाणात एकता दिसून येते. शहरात भातलादेवी मंदिर, जय अम्बे मंदिर, विठ्ठल मंदिर इत्यादी. मंदिरे शहरात धार्मिक वातावरण निर्माण करतात. या सर्व मंदिरांपैकी भातलादेवी मंदिर हे चिमाजी अप्पा यांनी स्थापन केले आहे. एकीकडे मंदिरांचा हा सुवर्ण इतिहास आहे. या शहराची प्रशासन व्यवस्था पूर्वी ग्रामपंचायत पाहत होती सध्या शहराची व्यवस्था महानगर पालिका पाहते. शहरात शैलेंद्र स्कूल, दहिसर विद्या मंदिर, तांबे हायस्कूल, फ्रान्सेक स्कूल तसेच महानगर पालिकेच्या तीन शाळा आहेत. शैक्षणिक तसेच व्यवसाय या बाबतीत परिपूर्णता असल्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. तसेच मुळगावकर हॉस्पिटल, पवार हॉस्पिटल, वरळीकर हॉस्पिटल आणि जैन समाजाकडून बांधण्यात आलेले मानव कल्याण केंद्र या सर्वामुळे लोकांचे जीवन मान सुधारलेले आहे. येथील व्यवसायात यांत्रिकीकरण झाले. तंत्रात्मक बदल झाले त्यामुळे व्यवसायात अनेकता दिसून येते. शहरातील सर्वच लोकसंख्या रोजगाराच्या बाबतीत शहरातील उद्योग धंद्यात सामावून घेण्यात शहर असमर्थ आहे त्यामुळे बेकारी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. काही ठिकांणी काजूपाडा, देवीपाडा इथे गलीच्छ वस्त्या देखील आस्तित्वात असल्याचे निर्दशनास येते. बोरीवली वरून जेव्हा दहिसरला येण्यासाठी रेल्वे ट्रेन सुटते तेव्हा दहिसर रेल्वे रुळांच्या बाजूला किंवा काहीसा रिकामा भाग आढळल्यास तिथे आपणास लाकडी फाट्याचे तुकडे, तट्टे, पत्रे, प्लास्टिकचे कागद, बांबू, माती याच्या सहाय्याने निर्माण केलेल्या अनेक अश्या झोपड्या दिसून येतात. या झोपड्यांना स्थानिकलोकांद्वारे खोली म्हटले जाते. सांडपाण्याची दलदल, माशा, डास यासारख्या आरोग्यवर्धकबाबी गलीच्छ वस्त्यात आढळून येतात. अश्या वस्त्यांत अनेक कुटुंबाच्या समोर दारिद्र्र्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. यामुळे येथील कुटुंब व्यावस्था काहीशी विस्कळीत सुद्धा दिसून येते. अनेक कुटुंबात समाजविरोधी कृत्य सर्रास चाललेली आढळतात. जीवनविषयक कल्पनाचे इथे बहुतेक लोक पालन करताना दिसत नाही.शहराची वाढ होत आहे. शहरात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते. गर्दीचा विचार केल्यास शहरात लोकांना रस्ते,मोकळीजागा,मैदाणे,उद्याने इत्यादीची संख्या फारच कमी आहे. शहरात मानगरपालिकाद्वारे प्रशासन व्यावस्थेची चालवली जाते. महानगरपालिकेच्या इच्छीक कार्यात लोकांच्या सोयीसाठी उद्याने, स्टेडियम, नाट्यगृह, वृक्षारोपन, करमणूक साधनाची उपलब्धा, रस्ते व्यावस्था, गटराची स्वच्छता, वाहतूक नियंत्रण इत्यादी कार्याचा समावेश केला जात असला तरी, दहिसर शहरात महानगरपालिकेला योग्यरीत्या आपल्या कामाची अंमलबजावणी करणे जमलेले दिसून येत नाही.