घाटकोपर मेट्रो स्थानक

घाटकोपर हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक टर्मिनस आहे. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारा ११ किमी लांबीचा हा मार्ग येथे संपतो. हे स्थानक घाटकोपर उपनगराच्या पश्चिम भागात घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ स्थित आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले. आजच्या घडीला घाटकोपर हे मेट्रो मार्गावरील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.

घाटकोपर
मुंबई मेट्रो स्थानक
Ghatkopar Metro board.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता घाटकोपर (पश्चिम), मुंबई
गुणक 19°05′12″N 72°54′29″E / 19.08667°N 72.90806°E / 19.08667; 72.90806
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १टर्मिनस

मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग येथे जुळत असल्यामुळे लोकल प्रवाशांना मेट्रोचा वापर करणे सुलभ आहे.