डहाणू
डहाणू महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील गाव आहे.
या गावाला सुंदर व शांत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.
मूळ डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे येथील परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.
बाह्य दुवे
संपादन- डहाणू दर्शन Archived 2013-12-17 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |