चर्नी रोड रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरीय रुळपथ स्थानक
चर्नी रोड हे मुंबई शहराच्या गिरगांव भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.
चर्नी रोड रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाचा देखावा | |
स्थानक तपशील | |
पत्ता | गिरगांव, मुंबई |
गुणक | 18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
चर्नी रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मरीन लाइन्स |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: ग्रँट रोड | |
स्थानक क्रमांक: ३ | चर्चगेटपासूनचे अंतर: २ कि.मी. |
इतिहास
संपादनया स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले.