भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई)
भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.
ब्रीदवाक्य | ज्ञानम् परमम् ध्येयम् (ज्ञानप्राप्ती हेच माझे मुख्य ध्येय आहे) |
---|---|
President | प्रो. देवांग खाखर |
पदवी | ३४०० |
स्नातकोत्तर | ४६०० |
Campus | शहरी, ५५०एकर , उत्तर-मध्य मुंबई |
इतिहास
संपादनपंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.
हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
परिसर
संपादनभारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत.
- पवई तलाव
- पद्मावती देवीचे मंदिर
प्रशासन
संपादनशैक्षणिक
संपादनविभाग
संपादनभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे.
- वयुअवकाश अभियांत्रिकी
- रसायन अभियांत्रिकी
- रसायन शास्त्र
- स्थापत्य अभियांत्रिकी
- संगणक विज्ञान व अभियांत्रिकी
- पृथ्वी विज्ञान
- विद्युत अभियांत्रिकी
- मानविकी एवं सामाजिक विज्ञान
- औद्योगिक अभिकल्प केंद्र (IDC)
- गणित
- यान्त्रिक अभियांत्रिकी
- धातु अभियंत्रण एवं पदार्थ विज्ञान
- भौतिकशास्त्र
- उर्जा विज्ञान व अभियांत्रिकी
संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत.
केंद्रे
संपादनभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत
- ग्रामीण क्षेत्रांकारिता पर्यायी तत्राद्यान केंद्र
विद्यालय
संपादन३ विद्यालये आहेत.
संशोधन आणि विकास
संपादनप्रसिद्ध माजी विद्यार्थी
संपादन- भरत देसाई सिंटेलचे जनक
- नरेंद्र करमरकर गणितज्ञ
- सुधींद्र कुलकर्णी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सल्लागार
- उदय कुमार रुपया चिन्हाचा निर्माता
- प्रणव मिस्त्री संगणक तंत्रज्ञ
- विक्टर मेंझेस सिटी समुहाचा उपाध्यक्ष
- नंदन निलेकणी इन्फोसिसचा पूर्व कार्यकारी अध्यक्ष
- मनोहर पर्रीकर गोवा माजी मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
- जयराम रमेश पूर्व केंद्रीय पर्यावरण मंत्री
- अजित रानडे
कार्यक्रम (Events, Students Activity)
संपादन- टेकफेस्ट Archived 2008-02-24 at the Wayback Machine.
- मुडईंडिगो Archived 2014-02-27 at the Wayback Machine.
- झायफर
- युरेका Archived 2011-01-04 at the Wayback Machine.
- ऑव्हेन्यू Archived 2011-02-02 at the Wayback Machine.