जुलै १९
दिनांक
(१९ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०० वा किंवा लीप वर्षात २०१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सोळावे शतकसंपादन करा
- १५५३ - मेरी पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
सतरावे शतकसंपादन करा
- १६९२ - अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९१२ - अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
- १९४० - दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
- १९४७ - म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑॅंग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
- १९६३ - ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
- १९६७ - पीडमॉॅंट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
- १९७६ - नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
- १९७९ - निकाराग्वात उठाव.
- १९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.
- १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १८१४ - सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
- १८३४ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
- १८७६ - जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९४ - ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
- १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
- १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
- १९४६ - इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
- १९५५ - रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ५१४ - पोप सिमाकस.
- ९३१ - उडा, जपानी सम्राट.
- १९४७ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- १९६५ - सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- २००४ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- शहीद दिन - म्यानमार.
- राष्ट्रीय मुक्ती दिन - निकाराग्वा.
- राष्ट्राध्यक्ष दिन - बॉत्स्वाना.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै महिना