जुलै २९
दिनांक
जुलै २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१० वा किंवा लीप वर्षात २११ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनतिसरे शतक
संपादन- २३८ - रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसऱ्याला सम्राटपदी बसवले गेले.
जन्म
संपादन- १६०५ - सायमन डाख, जर्मन कवी.
- १७६३ - फिलिप चार्ल्स ड्युरॅम, रॉयल नेव्हीचा दर्यासारंग.
- १८८३ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १८९८ - इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९०५ - दाग हॅमरशील्ड, संयुक्त राष्ट्रांचा महासचिव.
- १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
- १९३७ - डॅनियेल मॅकफॅडेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ.
- १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७० - जॉन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - लंका डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - फर्नांडो गॉन्झालेझ, चिलेचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- २३८ - पुपियेनस, रोमन सम्राट.
- २३८ - बाल्बिनस, रोमन सम्राट.
- १०३० - ओलाफ तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १०९९ - पोप अर्बन दुसरा.
- ११०८ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- १६४४ - पोप अर्बन सहावा.
- १८९० - फिंसेंत फान घो, डच चित्रकार.
- १९०० - उंबेर्तो पहिला, इटलीचा राजा.
- १९८७ - बिभूतीभूषण मुखोपाध्याय, बंगाली लेखक.
- १९९० - ब्रुनो क्रेस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९९४ - डोरोथी क्रोफूट हॉजकिन, नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ (जुलै महिना)