बेनितो मुसोलिनी हा इटलीचा माजी पंतप्रधान व हुकुमशहा होता. हुकूमशाह बनण्याआधी तो एक पत्रकार होता. नंतर तो इटालियन राजकारणात आला. इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.

बेनितो मुसोलिनी
Benito Mussolini (primo piano).jpg

इटलीचा ४० वा पंतप्रधान
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर १९२२ – २५ जुलै १९४३

जन्म २९ जुलै १८८३
प्रेदाप्पियो, इटली
मृत्यू २८ एप्रिल १९४५ (वय: ६१)
ज्युलिनो दि मेझाग्रा, इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
धर्म रोमन कॅथॉलिक
डावीकडून उजवीकडे, तुम्ही माजी कम्युनिस्ट राजकारणी निकोला बॉम्बाकी, ड्यूस बेनिटो मुसोलिनी, त्यांची विश्वासू प्रियकर क्लारा पेटासी, मंत्री अलेस्सांद्रो पावोलिनी आणि प्रसिद्ध फॅसिस्ट राजकारणी अचिले स्टारेस यांचे निर्जीव मृतदेह पाहू शकता, जे प्लाझा लोरेटोमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. १९४५ मध्ये मिलान शहर.

एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.