अनंत भावे
प्रा. अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक पत्रकार आणि वक्ते आहेत. श्री.ग. माजगावकर यांच्या माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करीत. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद पडले. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद झाला होता. अन्य पुस्तकांखेरीज भावे यांचे बरेच बालवाङ्मय प्रसिद्ध झाले आहे.
पुस्तके
संपादन- अग्गड हत्ती तग्गड बंब (बालवाङ्मय)
- अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी (बालवाङ्मय)
- A Flint Stone Becomes A Sparkling Star (बालवाङ्मय) (सहलेखिका माया पंडित)
- अब्दुल गब्दुल (बालकविता)
- अश्शी सुट्टी सुरेख बाई ! (बालकविता)
- उथ्थाप्पाचे उंदीर (बालवाङ्मय)
- एरिक लोमॅक्सचा दीर्घ प्रवास (बालवाङ्मय)
- ॐ कासवाय नमः (बालवाङ्मय)
- कासव चाले हळू हळू (बालकविता)
- खंडोबा आणि खंडोबा : वाचा आणि रंगवा (बालवाङ्मय)
- गरागरा गरागरा (बालकविता)
- गारगोटी झाली आकाशचांदणी (बालकविता)
- गिरकी घेऊन कबुतर सांगतंय (बालवाङ्मय)
- घसरगुंडी पसरगुंडी (बालवाङ्मय)
- चल रे भोपळो टुणुक टुणुक (बालवाङ्मय)
- चला खाऊ पाणीपुरी (बालवाङ्मय)
- चलो डोंगरगाव ! (बालवाङ्मय)
- चिक्कीखाव् (बालकविता)
- चिमणे चिमणे (बालकविता)
- चिमी - चिमाजीची सर्कस (बालवाङ्मय)
- चेंडूच्या फिरक्या (बालवाङ्मय)
- झिमझिमपूरची झूम (बालवाङ्मय)
- झिम झिम सरी (बालकविता)
- जांभूळवनात सापशिडी (बालवाङ्मय)
- जिराफ - झेब्रा - उंट - गेंडा - हिप्पो - हत्ती (बालकविता)
- जोडाक्षरविरहित कविता : (खंडोबा आणि खंडोबा) वाचा आणि रंगवा
- टंगळ-मंगळ (बालवाङ्मय)
- टमू ठमू ढमू (कवितासंग्रह, बालवाङ्मय)
- टिंबाराणी आणि इतर गोष्टी (बालवाङ्मय)
- टेकाड्या (बालसाहित्य - नाटक)
- डोंगरगावची चेटकीण (बालवाङ्मय)
- तीन प्रवासी बारा पाय (बालवाङ्मय)
- दुसरे महायुद्ध : काही कथा (बालवाङ्मय)
- दोन चेहऱ्यांचा हेर रुडॉल्फ एबेल (बालवाङ्मय)
- पटपटपूर पटपटपूर (विनोदी बालकवितासंग्रह)
- 'बिस्मार्क' ची शिकार (बालवाङ्मय)
- मगरी मनातल्या (बालवाङ्मय)
- माझी खार माझी खार (बालकविता)
- मांजर - उंदीर - कुत्रे (कवितासंग्रह)
- मॉंटीज डबल (व्यक्तिचित्रण)
- मिठाईमॅड गुडबॉय (बालवाङ्मय)
- मीच मान्या - मीच मेरी (क्युरी) (व्यक्तिचित्रण) (ऑडिओबुक)
- युद्धकथा (कथासंग्रह)
- लालमलाल (बालवाङ्मय)
- सांगतात नेहरू चाचा वाचा : वाचा : वाचा (बालवाङ्मय)
- सांगा सांगा ढगोजीबाप्पा ! (बालकविता)
- हसो हसो (बालकविता)
- उच्चकपाचक अंदाजपंचे
- उंच उडी खोल बुडी
पुरस्कार
संपादन- साहित्य अकादमीचा २०१४ सालचा बालसाहित्याचा पुरस्कार. ताम्रपट व पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.