अर्चना जोगळेकर
अर्चना जोगळेकर ह्या एक मराठी, हिंदी, तामीळ, उडिया या भाषांतील चित्रपटांत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या एक कथ्थक नृत्त्यांगना, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याही आहेत. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.
इतिहास
संपादनअर्चना जोगळकर लग्नानंतर अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्या. आशा जोगळेकर यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणाऱ्या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम अर्चना यांच्यावर सोपवली.
नृत्यालयांची प्रगती
संपादन’अर्चना नृत्यालया’तील अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारची ’कल्चरल टॅलेंट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. अनेक मुली नृत्यस्पर्धांत पारितोषिके मिळवतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी ’अर्चना नृत्यालय’ मुलींची तयारी करून घेते. अनेक मुली नृत्य अलंकार, नृत्य विशारद या परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात.
बाल कलाकार संगीत संमेलन
संपादन’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.
अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेले चित्रपट
संपादन- अपेक्षित (मराठी)
- आग से खेलेंग (हिंदी) (१९९८)
- आतंक ही आतंक (१९९५)
- निवडुंग (मराठी)
- बात है प्यार की (हिंदी) (१९९१)
- मर्दानगी (मराठी) (१९८८)
- मॅरिड टु अमेरिका (२०१२)
- मोगामुल (तामीळ) (१९९४)
- रंगत संगत (मराठी) (१९८८)
- संसार (मराठी) (१९८७)
- सुना चढेई (उडिया) (१९८७)
- स्त्री (उडिया) (१९९८)
अर्चना जोगळेकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
संपादन- अवघाची संसार (मराठी)
- कर्मभूमी (हिंदी)
- किस्सा शांति का (हिंदी)
- चुनौती (हिंदी) (१९८७)
- फूलवाली (हिंदी) (१९९२)
- साम्राज्य (हिंदी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |