अणुविघटन होतांना होणाऱ्या उत्सर्जनाला किरणोत्सर्ग असे म्हणतात. किरणोत्सर्ग ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्याने तो आपल्याला जाणवत नाही. किरणोत्सर्ग आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. सुर्यप्रकाश, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल हवेतून, खाद्यपदार्थातून तर आसमंतातल्या टेकडय़ा, कातळ अगदी मातीतूनही किरणोत्सर्ग होत असतो. वैद्यकीय चाचण्या व उपचार पद्धतीत नियंत्रीत/सामान्य किरणोत्सर्गाचा वापर होतो.

किरणोत्सर्गामागील मानवी कारणे

संपादन

कोबाल्ट, युरेनियम, युरेनिअम २३५, थोरिअम, प्लुटोनिअम इ. घटकांपासून किरणोत्सर्जन घडते. अणुभट्टी मध्ये न्युट्रॉनचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचे काम फसले की उष्णतेचे नियंत्रण बंद होते. अणुभट्टीच्या आतील उष्णतामान एवढे वाढते, की आण्विक इंधन वितळू लागते. अनियंत्रित अशा उष्णतेचे हे प्रमाण १००० फॅरनहाईट पेक्षाही अधिक होत जाते. त्यातून अनियंत्रित असा किरणोत्सर्ग होऊ लागतो.

किरणोत्सर्गाचे प्रमाण "मिलिरेम' पद्धतीने मोजले जाते सरासरी वार्षिक ६२० मिलिरेम एवढ्या प्रमाणातील किरणोत्सर्ग मनुष्यप्राणी सहन करू शकतो. चेर्नोबिल येथे २६ एप्रिल इ.स. १९८६ रोजी दुर्घटना घडली तेव्हा तेथे हे प्रमाण ८० हजार ते १६ लाख मिलिरेम इतके होते. पावणेचार लाख ते पाच लाख मिलिरेम इतका किरणोत्सर्ग तीन महिन्यांत प्राणघातक ठरतो. चेर्नोबिल भोवतीचा ३० किलोमीटरचा परिसर आजही निर्मनुष्य अवस्थेत ठेवण्यात आलेला आहे.

परिणाम

संपादन

मोठ्या प्रमाणातील किरणोत्सर्गामुळे कर्करोग ( कॅन्सर ), जन्मजात विकलांगता (पुनरुत्पादक पेशींवर परिणाम होऊन), नपुंसकता, बालवयात वृद्धत्व, किडनीचे विकार आणि इतर अनेक विकार होतात.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन