गंगवान (कोरियन: 강원도) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पूर्व भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. येथील बराचसा भूभाग डोंगराळ असून देशाच्या इतर भागांच्या तुलनेत येथील वस्ती तुरळक आहे. या प्रांतात समुद्राचे खारे पाणी वापरून तयार केलेले टोफू तथा सुंदुबु प्रसिद्ध आहे.[१]

गंगवान
강원도
दक्षिण कोरियाचा प्रांत

गंगवानचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
गंगवानचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी चुनचॉन
क्षेत्रफळ १६,८७४ चौ. किमी (६,५१५ चौ. मैल)
लोकसंख्या १५,४३,५५५
घनता ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-42
संकेतस्थळ gwd.go.kr

गंगवान प्रांतामधील प्यॉंगचांग ह्या शहरामध्ये २०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ ली, सिन वू. "Beyond Seoul: 19 reasons to explore Korea". 6 May 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: