जुलै १७
दिनांक
(१७ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९८ वा किंवा लीप वर्षात १९९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
अकरावे शतकसंपादन करा
- १०४८ - दमासस दुसरा पोपपदी.
तेरावे शतकसंपादन करा
- १२०३ - चौथी क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने कॉन्स्टेन्टिनोपल जिंकले.
अठरावे शतकसंपादन करा
- १७६२ - कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
- १७९१ - फ्रेंच क्रांती - शॉं दि मारची कत्तल. १,२०० ते १,५०० व्यक्तींची हत्या.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८१५ - नेपोलियन बोनापार्टने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १८९७ - अलास्काच्या क्लॉन्डाइक भागात सोने शोधण्यासाठी गेलेली काही माणसे मुबलक सोन्याची वार्ता घेउन परतली आणि क्लॉन्डाइक गोल्ड रशची सुरुवात झाली.
विसावे शतकसंपादन करा
- १९१७ - इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
- १९१८ - रशियाचा झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबाची हत्या.
- १९३६ - स्पॅनिश गृहयुद्धाला तोंड फुटले.
- १९४४ - अमेरिकेत पोर्ट शिकागो येथे दारुगोळ्याने भरलेल्या दोन जहाजांवर स्फोट. २३२ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
- १९५४ - कॅलिफोर्नियात डिस्नेलॅंड खुले.
- १९७५ - अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
- १९७६ - ईंडोनेशियाने पूर्व तिमोर बळकावले.
- १९७६ - कॅनडातील मॉॅंट्रिआल शहरात एकविसावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९७९ - निकाराग्वाच्या राष्ट्राध्यक्ष जनरल अनास्तासियो सोमोझा देबेलने मायामी येथे पलायन केले.
- १९८१ - अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
- १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- १९९५ - अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
- १९९६ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स फ्लाइट ८०० हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कजवळ समुद्रात कोसळले. २३० ठार.
- १९९८ - रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
- १९९८ - पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर त्सुनामी. १,५०० मृत्युमुखी, २,००० गायब.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००४ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
- २००६ - ईंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.
- २००६ - टॅम एरलाइन्सचे टॅम एरलाइन्स फ्लाइट ३०५४ हे विमान साओ पाउलो विमानतळावर उतरताना कोसळले. अंदाजे १९९ ठार.
- २०१४ - युक्रेनपासून स्वातंत्र्य मागणाऱ्या रशियाधार्जिण्या दहशतवाद्यांनी मलेशियन एरलाइन्सचे विमान पाडले. २९८ ठार.
जन्मसंपादन करा
- १४८७ - इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.
- १८३१ - शियानफेंग, चीनी सम्राट.
- १९१८ - कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - हुआन ॲंतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.
- १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - एंजेला मर्केल, जर्मनीची चान्सेलर.
- १९६३ - लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.
मृत्यूसंपादन करा
- ९२४ - मोठा एडवर्ड, इंग्लंडचा राजा.
- १०८६ - कॅन्युट चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९१८ - निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).
- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- बाथ क्रांती दिन - इराक.
- लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको.
- संविधान दिन - दक्षिण कोरिया.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - (जुलै महिना)