दुसरी कॅथरीन, रशिया

(कॅथेरिन दुसरी, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.[१]

कॅथरीन द ग्रेट
Profile portrait of Catherine II by Fedor Rokotov (1763, Tretyakov gallery).jpg
दुसरी कॅथरीन हिचे फेदोर रोकोतोवने काढलेले चित्र
अधिकारकाळ ९ जुलै, इ.स. १७६२१७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
राज्याभिषेक १२ सप्टेंबर, इ.स. १७६२
पूर्ण नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका
पदव्या दुसरी कॅथरीन
जन्म २ मे, इ.स. १७२९
स्टेटिन, प्रशिया
मृत्यू १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
पूर्वाधिकारी तिसरा पीटर
उत्तराधिकारी पहिला पॉल
वडील क्रिस्तियन ऑगस्टस
आई जोहाना एलिझाबेथ
पती तिसरा पीटर

परिचयसंपादन करा

 
कॅथेरिन दुसरी, रशिया

तिसरा पीटर म्हणजेच द ग्रॅंड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले.

एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ CATHERINE II. ब्रिटानिका (इंग्रजी भाषेत). Archived from the original on १० ऑक्टोबर २०१३.

बाह्यदुवेसंपादन करा