अनास्तासियो सोमोझा देबेल
अनास्तासियो सोमोझा देबेल (स्पॅनिश: Anastasio Somoza Debayle; ५ डिसेंबर १९२५ - १७ सप्टेंबर १९८०) हा मध्य अमेरिकेमधील निकाराग्वा देशाचा हुकुमशहा व राष्ट्राधक्ष होता. १९६७ ते १९७९ दरम्यान निकाराग्वाचा राष्ट्रप्रमुख राहिलेल्या देबेलने १९७९ साली पेराग्वेला पलायन केले. १९८० साली पेराग्वेमध्येच त्याची हत्या करण्यात आली.