सर एडवर्ड हीथ (इंग्लिश: Edward Richard George Heath) (जुलै ९, १९१६ - जुलै १७, २००५) हा १९७० ते १९७४ सालांदरम्यान युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान राहिलेला हुजूर पक्षीय राजकारणी होता. हीथ १९६५ ते १९७५ सालांदरम्यान हुजूर पक्षाचा पक्षनेता होता. हीथ पंतप्रधानपदी निवडले जाण्याची घटना हुजूर पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक मानली जाते, कारण हॅरोल्ड मॅकमिलन, ऍलेक डग्ल्स-होम इत्यादी उमराव मंडळींच्या नेतृत्वाची परंपरा लोपून हीथ व मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या केवळ गुणवत्तेच्या बळावर राजकारणात पुढे आलेल्या नेत्यांची सद्दी सुरू झाली.

एडवर्ड हीथ
Edward Heath 8 Allan Warren.jpg

कार्यकाळ
१९ जून १९७० – ४ मार्च १९७४
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील हॅरल्ड विल्सन
पुढील हॅरल्ड विल्सन

जन्म ९ जुलै १९१६ (1916-07-09)
केंट, इंग्लंड
मृत्यू १७ जुलै, २००५ (वय ८९)
सॉल्झब्री, विल्टशायर, स्कॉटलंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

बाह्य दुवेसंपादन करा