हॅरल्ड मॅकमिलन

(हॅरोल्ड मॅकमिलन या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉरीस हॅरल्ड मॅकमिलन, स्टॉक्टनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Maurice Harold Macmillan, 1st Earl of Stockton; १० फेब्रुवारी १८९४ - २९ डिसेंबर १९८६) हा ब्रिटिश राजकारणी व १९५७ ते १९६३ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

हॅरल्ड मॅकमिलन

कार्यकाळ
१० जानेवारी १९५७ – १८ ऑक्टोबर १९६३
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील अँथनी ईडन
पुढील अ‍ॅलेक डग्लस-होम

जन्म १० फेब्रुवारी १८९४ (1894-02-10)
लंडन, इंग्लंड
मृत्यू २९ डिसेंबर, १९८६ (वय ९२)
ईस्ट ससेक्स, इंग्लंड

दुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेला मॅकमिलन त्याच्या धोरणी व दूरदृष्टी स्वभावासाठी ओळखला जात असे. त्याच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने अमेरिकेसोबत संबंध बळकट केले. तसेच मॅकमिलनच्या सरकारने आफ्रिका खंडामधील नायजेरिया, सियेरा लिओन, टांझानिया, युगांडा, केन्या, मलावी, झाम्बिया, गांबिया, झिम्बाब्वे, बोत्स्वाना, लेसोथो, मॉरिशसस्वाझीलँड ह्या भूतपूर्व वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले.


बाह्य दुवे

संपादन