इंचॉन
इंचॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल व बुसान खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
इंचॉन 인천 |
|
दक्षिण कोरियामधील शहर | |
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
स्थापना वर्ष | १८८३ |
क्षेत्रफळ | १,०२९.४ चौ. किमी (३९७.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २८,७०,५४५ |
- घनता | २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० |
incheon.go.kr |
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळ इंचॉनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान भरवले जातील.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |