रमण लांबा

भारताचा क्रिकेट खेळाडू.

रमण लांबा (जन्म : उत्तर प्रदेश, भारत, जानेवारी २, इ.स. १९६०; मृत्यू : ढाका, बांग्लादेश, फेब्रुवारी २३, इ.स. १९९८) हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले खेळाडू होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करत असत. भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून ते ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळले. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात शॉर्ट लेग क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्राणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला.


पहा : फिलिप ह्यूज; सयाजीराव धनवडे

बाह्य दुवेसंपादन करा


  भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.