कुसुमावती देशपांडे

मराठी लेखिका व समालोचक


कुसुमावती देशपांडे (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, १९०४; - नागपूर, १७ नोव्हेंबर, १९६१) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.

कुसुमावती आत्माराम देशपांडे
जन्म नाव कुसुम रामकृष्ण जयवंत
जन्म १० नोव्हेंबर १९०४
अमरावती
मृत्यू १७ नोव्हेंबर १९६१
२६ ,मीना बाग , दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती दीपमाळ
वडील रामकृष्ण रावजी जयवंत
आई सीताबाई रामकृष्ण जयवंत
पती आत्माराम रावजी देशपांडे
अपत्ये किशोर , शिरीष , उल्हास , अभय

शिक्षण

संपादन

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९२६ साली बी.ए.ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेथून त्या १९२९ साली बी.ए.(इंग्रजी वाङ्मय) झाल्या.

कारकीर्द

संपादन

नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या.

"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.

१९६१ला ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला.

विवाह

संपादन

१९२९ साली त्यांचे कवी अनिल यांच्याशी लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. जात वेगळी असल्याने घरातून झालेला प्रचंड विरोध सहन करून हे लग्न झाले.

ग्वाल्हेर साहित्य संमेलनानंतर महिन्याभरातच १७ नोव्हेंबर १९६१ या दिवशी कुसुमावतीबाईंचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. [१]

प्रकाशित साहित्य

संपादन
  • कुसुमानिल (कुसुमावती आणि पती अनिल यांच्यामधील पत्रांचा संग्रह)
  • दीपकळी (१९३४)
  • दीपदान (१९४०)
  • दीपमाळ
  • पासंग (१९५४)
  • मराठी कादंबरी (पहिले शतक) (१९५३)
  • मोळी (१९४५)
  • २६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेत पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
  • डॉ. अनंत देशमुख यांनी कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करणारा ’कुसुमावती देशपांडे’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ भागवत, डॉ. गीता. "अनिलांची रुसलेली 'प्रिया'". 7 सप्टेंबर 2019 रोजी पाहिले.