नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत.

चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.

चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.

चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व
 • आठवणीतले दिवस
 • कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
 • कायदा आणि माणूस
 • कहाणी हैदराबाद लढ्याची
 • तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
 • तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
 • त्यांना समजून घेताना (ललित)
 • दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
 • नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
 • नामदार गोखल्यांचं शहाणपण
 • न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
 • न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
 • मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
 • महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
 • राज्यघटनेचे अर्धशतक
 • विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
 • संघर्ष आणि शहाणपण
 • समाज आणि संस्कृती
 • संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
 • सावलीचा शोध (सामाजिक)
 • हरवलेले स्नेहबंध

सन्मान आणि पुरस्कारसंपादन करा