नागनाथ कोत्तापल्ले
नागनाथ कोत्तापल्ले (२९ मार्च, इ.स. १९४८ - ३० नोव्हेंबर २०२२) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक होते. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते.[१] ते ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
नागनाथ कोत्तापल्ले | |
---|---|
जन्म नाव | नागनाथ कोत्तापल्ले |
जन्म |
२९ मार्च, इ.स. १९४८ मुखेड, नांदेड जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | प्राध्यापक |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य |
विषय | सामाजिक, राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक |
चळवळ | ग्रामीण साहित्य चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती |
मूड्स गांधारीचे डोळे ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध निवडक बी. रघुनाथ दारोबस्त लिंपुन घ्यावा मेंदू |
अपत्ये | नितीन |
पुरस्कार |
|
जीवन
संपादननागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला.[२] शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले.[३] त्यांनी १९८० मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथुन डॉ.यु.म.पठाण सरांच्या मार्गदर्शनाने 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर पीएच. डी.चे संशोधन केले, पदवी मिळवली.
कारकीर्द
संपादननागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.
नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.[४]
मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (२००३) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. [२] [५][२]
कोतापल्लेंच्या साहित्यावरील लेखन
संपादन- डॉ.नागनाथ कोतापल्ले : व्यक्ती आणि वाङ्मय (संपादन : डॉ. शैलेश त्रिभुवन)
प्रकाशित साहित्य
संपादनकविता संग्रह
संपादन- कृष्णमेघ
- मूड्स
- दारोबस्त लिंपुन घ्यावा मेंदू (सायन प्रकाशन,पुणे -२०१९)
कादंबरी व कथासंग्रह
संपादन- कर्फ्यू आणि इतर कथा
- कवीची गोष्ट
- गांधारीचे डोळे
- देवाचे डोळे
- पराभव
- मध्यरात्र
- रक्त आणि पाऊस
- राजधानी
- संदर्भ
- सावित्रीचा निर्णय
- उद्याच्या सुंदर दिवसांसाठी
- काल त्रिकाल
समीक्षण, वैचारिक
संपादन- अपार्थिवाचे गाणे
- अस्तित्वाची शुभ्र शिडे
- आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप
- ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध
- ज्योतिपर्व
- दहा समीक्षक
- नवकथाकार शंकर पाटील
- निवडक बी. रघुनाथ
- पाचोळा
- पापुद्रे
- साहित्याचा अन्वयार्थ
- साहित्याचा अवकाश (समीक्षा)
- स्त्री-पुरुष तुलना
पुरस्कार
संपादननागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार:
- पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार [६]
- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ
- मूड्स (१९७६)
- संदर्भ (१९८४)
- गांधारीचे डोळे (१९८५)
- ग्रामीण साहित्य (१९८५)
- उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
- 'ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'साठी परिमल पुरस्कार (१९८५)
- 'ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
- दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
- यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
- 'राख आणि पाऊस'साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
- 'राख आणि पाऊस'साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
- 'साहित्य अवकाश'साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदी डॉ. कोत्तापल्ले
- ^ a b c "नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष". 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "नागनाथ कोत्तापल्ले यांचा प्रवास". ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ मोरे, संगीता. ‘प्रतिष्ठान’ची सूची (सप्टें.१९५३ ते ऑगस्ट २००३).
- ^ "नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष". ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "डॉ. नागनाथ कोत्तापल्ले". ७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]