मार्च २९
दिनांक
(२९ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८८ वा किंवा लीप वर्षात ८९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसहावे शतक
संपादन- ५३७ - व्हिजिलियस पोपपदी.
सतरावे शतक
संपादन- १६३२ - सेंट जर्मेनचा तह - इंग्लंडने तीन वर्षांपूर्वी जिंकलेला कॅनडाचा क्वेबेक प्रांत फ्रांसला परत केला.
अठरावे शतक
संपादन- १७९२ - स्वीडनचा राजा गुस्ताव तिसऱ्याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०९ - स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले.
- १८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले.
- १८४९ - ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
- १८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
- १८८२ - नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९३६ - जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे ऱ्हाइनलॅंड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला.
- १९६२ - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान ॲंटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीतील लुबेक गावावर बॉम्बफेक केली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - इंग्लंडवर व्ही-१ या उडत्या बॉम्बचा शेवटचा हल्ला.
- १९७१ - व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणाऱ्या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
- १९७३ - व्हियेतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हियेतनाममधून माघार घेतली.
- १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.
- १९९३ - एदुआर्द बॅलादुर फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००३ - बल्गेरिया, एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, रोमेनिया, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनियाला नाटोचे सभासदत्त्व.
- २००४ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला.
- २०१० - दोन आत्मघातकी स्त्री दहशतवाद्यांनी मॉस्कोच्या उपनगरी रेल्वेत सकाळच्या गर्दीत स्फोट घडवले. ४० ठार.
जन्म
संपादन- १५५३ - व्हित्सेंत्झोस कोमारोस, ग्रीक कवी.
- १७९० - जॉन टायलर, अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष.
- १७९९ - एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०० - जॉन मॅकइवेन, ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान.
- १९२९ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता (मृत्यु:१९९३)
- १९२९ - लेनार्ट मेरी, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - जगदीप, हास्य अभिनेते
- १९४३ - जॉन मेजर, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९६८ - ल्युसी लॉलेस, न्यू झीलंडची अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १०५८ - पोप स्टीवन नववा.
- १३६८ - गो-मुराकामी, जपानी सम्राट.
- १९५९ - बार्थेलेमी बोगांडा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.
- १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.
- १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता.
- २०२३ - गिरीश बापट, भारतीय जनता पक्षातील राजकारणी
प्रतिवार्षिक पालन
संपादन- बोगांडा दिन - मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक.
- युवा दिन - तैवान.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - (मार्च महिना)