लेनार्ट गेऑर्ग मेरी (एस्टोनियन: Lennart Georg Meri; २९ मार्च १९२९ - १४ मार्च २००६) हा एस्टोनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. एस्टोनियाला सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या एस्टोनियन पुढाऱ्यांपैकी एक असलेला मेरी पेशाने चित्रपट लेखक व दिग्दर्शक होता.

लेनार्ट मेरी

एस्टोनिया ध्वज एस्टोनियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
६ ऑक्टोबर १९९२ – ८ ऑक्टोबर २००१
मागील कॉन्स्टेन्टिन पाट्स
पुढील आरनोल्ड रूटेल

एस्टोनियाचा परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
एप्रिल १९९० – मार्च १९९२

जन्म २९ मार्च, १९२९ (1929-03-29)
तालिन
मृत्यू १४ मार्च, २००६ (वय ७६)
तालिन
गुरुकुल तार्तू विद्यापीठ

२००९ साली एस्टोनियामधील सर्वात मोठ्या विमानतळाला त्याचे नाव देण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन