मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व कॉंगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ही कॉंगो नदीची एक प्रमुख उपनदी मआप्रच्या दक्षिण दिशेने वाहते. बांगुई ही मआप्रची राजधानी व सर्वात मोठे शहर ह्याच नदीवर वसलेले आहे.
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक République centrafricaine Ködörösêse tî Bêafrîka | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Unité, Dignité, Travail" (एकता, मान, कष्ट) | |||||
राष्ट्रगीत: La Renaissance (रानिसां) | |||||
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बांगुई | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच, सांगो) | ||||
सरकार | प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | फ्रांस्वा बोझिझे | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १३ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६,२२,९८४ किमी२ (४३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४४,२२,००० (१२४वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ७.१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३.६४१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ७६७ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ०.३४३[१] (कमी) (१७९ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पश्चिम आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CF | ||||
आंतरजाल प्रत्यय | .cf | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | २३६ | ||||
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय शोधक मध्य आफ्रिकेमध्ये पोचले व १८८२ साली फ्रान्सने फ्रेंच कॉंगो वसाहत निर्माण केली. १ डिसेंबर १९५८ रोजी ह्या वसाहतीला स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला. बार्थेलेमी बोगांडा ह्या नव्या स्वायत्त प्रदेशाचा पंतप्रधान बनला परंतु काही अवधीतच त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. १३ ऑगस्ट १९६० रोजी मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाला स्वातंत्र्य मिळाले व सत्ता स्थापण्यासाठी बोगांडाच्या दोन सहकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. ३१ डिसेंबर १९६५ रोजी कर्नल ज्याँ-बेडेल बोकासा ह्या लष्करी अधिकाऱ्याने बंडामधून सत्ता बळकावली. त्याने देशाचे संविधान बरखास्त करून स्वतःला मध्य आफ्रिकेचा सम्राट ही उपाधी दिली. त्याने तब्बल १४ वर्षे मध्य आफ्रिकेवर हुकुमशाही गाजवल्यानंतर १९७९ साली फ्रान्सने त्याला हुसकावुन लावले परंतु पुन्हा दोन वर्षांनी एका नव्या लष्करी अधिकाऱ्याने सत्ता हातात घेतली. आजही लोकशाही केवळ नावापुरतीच अस्तित्वात असलेल्या ह्या देशामध्ये फ्रांस्वा बोझिझे हा लष्करप्रमुख २००३ सालापासून राष्ट्राध्यक्ष आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक जगात सर्वात खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. सध्या येथील अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत असून हा देश जवळजवळ संपूर्णपणे विदेशी अनुदानावर अवलंबून आहे.
खेळ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |