अभिराम भडकमकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराती अनुवाद झाले आहेत.
अभिराम भडकमकर | |
---|---|
जन्म | अभिराम भडकमकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१७) |
अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके
संपादन- अपलक निद्राहीन (हिंदी)
- आलटून पालटून
- कॉम्रेड का कोट (हिंदी)
- ज्याचा त्याचा प्रश्न
- देहभान
- पाहुणा
- प्रेमपत्र
- याच दिवशी याच वेळी
- लडी नजरिया (हिंदी)
- सवाल अपना अपना (हिंदी)
- सुखांशी भांडतो आम्ही
- स्थळ स्नेहमंदिर
- हसत खेळत
एकांकिका
संपादन- झाड
- धोबीपछाड
- पाच शून्यांची बेरीज
- ये गं ये गं सरी
पुस्तके
संपादन- ॲट एनी काॅस्ट (मराठी कादंबरी)
- असा बालगंधर्व (मराठी चरित्रकादंबरी)
- इन्शाअल्लाह (मराठी कादंबरी)
- चुडैल (मराठी कथासंग्रह)
अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट
संपादन- आई
- आम्ही असू लाडके
- एप्रिल फूल
- ए रेनी डे
- कमाल माझ्या बायकोची
- खबरदार
- घायल
- चिकट नवरा
- चेस
- जलसा
- दुर्गे दुर्गट भारी
- देवकी
- नवसाचे पोर
- पछाडलेला
- पाऊलवाट
- फुल थ्री धमाल
- बालगंधर्व
- मन्या सज्जना
- विटीदांडू
अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
संपादन- आम्ही असू लाडके
- बाबा लगीन
दिग्दर्शन केलेले माहितीपट
संपादन- फिल्म सिटी (मराठी)
- बिहाईंड द स्टेज (हिंदी)
अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट
संपादन- जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
- देवकी
- पछाडलेला
- पाऊलवाट
- फुल थ्री धमाल
- रामदेव आला रे बाबा
- रिलेशन्स (हिंदी)
भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका (दिग्दर्शक)
संपादन- आहट (हिंदी, बी.पी सिंग)
- चाणक्य (हिंदी, चंद्रकांत द्विवेदी)
- दामिनी (मराठी, कांचन अधिकारी)
- रास्ते (हिंदी, अलका मैत्र)
- सी.आय.डी (हिंदी, बी.पी सिंग)
- सैलाब (हिंदी, रवि राय)
- क्षितिज (हिंदी, आनंद राय)
दूरचित्रवाणी मालिका लेखन
संपादन- गोपालजी (हिंदी)
- टीचर (हिंदी)
- पुकार
- रास्ते (हिंदी)
- व्ही थ्री प्लस (हिंदी)
- साया (हिंदी)
- क्षितिज (हिंदी)
अभिराम भडकमकर यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- सन २०१७चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- 'असा बालगंधर्व' या कादंबरीसाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (२०१२)