रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

रणजित देसाई
जन्म नाव रणजित रामचंद्र देसाई
जन्म एप्रिल ८, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू मार्च ६, १९९२
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, नाटक, ललित,कथा
प्रसिद्ध साहित्यकृती स्वामी
वडील रामचंद्र देसाई
अपत्ये मधुमती शिंदे व पारू मदन नाईक
पुरस्कार पद्मश्री

रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले.

रणजित देसाई यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभोगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८७
आषाढ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
आलेख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कमोदिनी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कांचनमृग नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
कातळ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९६५
वैशाख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
गंधाली कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९७१
गरुडझेप नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७४
कणव कथासंग्रह देशमुख आणि कंपनी
जाण कथासंग्रह देशमुख आणि कंपनी
तुझी वाट वेगळी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
धन अपुरे नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
पंख जाहले वैरी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
पांगुळगाडा नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
पावनखिंड कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८१
प्रतीक्षा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रपात कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
बाबुल मोरा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
बारी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
मधुमती कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८२
माझा गांव कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
मेखमोगरी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मेघ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मोरपंखी सावल्या कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
राजा रविवर्मा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
राधेय कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७३
रामशास्त्री नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९८३
रूपमहाल कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
लोकनायक नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९८३
वारसा नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस
वैशाख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
लक्ष्यवेध कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
शेकरा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९९८
श्रीमान योगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६८
संकेत कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
संचित ललित,भाषणसंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस २००१  
समिधा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७९
सावली उन्हाची नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
स्नेहधारा ललित मेहता पब्लिशिंग हाऊस १९९७
संगीतसम्राट तानसेन नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७५
स्वामी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
स्वामी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७५
हे बंध रेशमाचे नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७२

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन