एजियन समुद्र
समुद्र
एजियन समुद्र (ग्रीक: Αιγαίο Πέλαγος, एजेओ पेलागोस; तुर्की: Ege Denizi;) हा दक्षिण बाल्कन प्रदेश व अनातोलियाचे द्वीपकल्प यांच्यादरम्यान, म्हणजेच ग्रीस आणि तुर्कस्तान देशांच्या मुख्यभूदरम्यान पसरलेला भूमध्य समुद्राचा खाडीसदृश भाग आहे. हा उत्तरेस मार्माराचा समुद्र व काळा समुद्र यांना दार्दानेलिया व बोस्फोरस सामुद्रधुन्यांनी जोडला आहे. या समुद्राच्या पाण्याचा रंग अतिशय गडद निळा असा आहे. त्यामुळे बेटांबरून या समुद्राची दृश्ये अतिशय देखण्याजोगी आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत