डार्डेनेल्झ (तुर्की: Çanakkale Boğazı, ग्रीक: Δαρδανέλλια) ही युरोपआशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडते. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.

तुर्कस्तानच्या नकाशावर डार्डेनेल्झ
तुर्कस्तानच्या नकाशावर डार्डेनेल्झ (पिवळा रंग) व बोस्फोरस (लाल रंग)

डार्डेनेल्झची लांबी ६१ किमी असून कमाल रूंदी ६ किमी तर किमान रूंदी १.२ किमी इतकी आहे तर सरासरी खोली १८० फूट आहे. डार्डेनेल्झच्या दोन्ही किनाऱ्यांवर चानाक्काले शहर वसले आहे.


बाह्य दुवे

संपादन

40°12′N 26°24′E / 40.2°N 26.4°E / 40.2; 26.4