सुएझ कालवा

इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा

सुएझ कालवा (अरबी: قناة السويس‎) हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्रलाल समुद्रांना जोडणारा हा कालवा १९३.३ किलोमीटर (१२०.१ मैल) लांबीचा असून त्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले. in 1869 Suez Canal open for international transport. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे युरोपआशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरू होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे ७००० किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे.

सुएझ कालव्याचे उपग्रहावरून टिपलेले चित्र
सुएझ कालव्याचे उपग्रहावरून टिपलेले चित्र

६ ऑगस्ट, २०१५ रोजी या कालव्याला समांतर असा ३४ किमी (२१ मैल) लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. यामुळे येथून दिवसाला ४९ च्या ऐवजी ९७ जहाजे जाऊ शकतील.

सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मध्ये स्थापन केली.

30°42′18″N 32°20′39″E / 30.70500°N 32.34417°E / 30.70500; 32.34417

सुवेझ