सुएझचे आखात (अरबी: خليج السويس) हे लाल समुद्राच्या उत्तरेकडील एक मोठे आखात आहे. ह्या आखाताच्या पूर्वेस सिनाई द्वीपकल्प तर पश्चिमेस आफ्रिका खंड असून ते व अकाबाचे आखात हे दोन लाल समुद्राचे उत्तरेकडील भाग आहेत. संपूर्णपणे इजिप्तच्या अखत्यारीत असलेले सुएझचे आखात आफ्रिका व आशिया खंडांना वेगळे करते. ह्या आखाताच्या उत्तर टोकाला सुएझ कालवा आहे जो अरबी समुद्राला भूमध्य समुद्रासोबत जोडतो.

अकबाचे आखात

28°45′N 33°00′E / 28.750°N 33.000°E / 28.750; 33.000