लाल समुद्र हा आफ्रिकाआशिया खंडांच्या मधील एक चिंचोळा समुद्र आहे. लाल समुद्राच्या उत्तरेस सिनाई द्वीपकल्प, अकबाचे आखातसुएझचे आखात (जेथून सुएझ कालवा सुरू होतो) आहेत तर दक्षिणेस एडनचे आखात आहे. लाल समुद्राच्या पूर्वेस पश्चिम आशियामधील सौदी अरेबियायेमेन तर पश्चिमेस आफ्रिकेमधील इजिप्त, सुदान, इरिट्रियाजिबूती हे देश आहेत. दक्षिणेस आफ्रिकेच्या शिंगाला आशियापासून वेगळे करणारी बाब-अल-मांदेब ही सामुद्रधुनी लाल समुद्राची सीमा मानली जाते.

लाल समुद्राचे उपग्रहाने घेतलेले चित्र

जेद्दाह हे सौदी अरेबियामधील शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. सुएझ कालव्यामुळे भूमध्य समुद्रामधून लाल समुद्रापर्यंत थेट जलवाहतूक शक्य आहे.