एप्रिल ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९७ वा किंवा लीप वर्षात ९८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

 • १८२७ - जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
 • १८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.

विसावे शतकसंपादन करा

 • १९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
 • १९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
 • १९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
 • १९४८जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.
 • १९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा कॉंग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.
 • १९६४ - आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० (System/360) ची घोषणा.
 • १९६९ : आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.
 • १९७८ : अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बॉंबची निर्मिती पुढे ढकलली.
 • १९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
 • १९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००१ : 'नासा'चे 'मार्स ओडिसी' यान मंगळाच्या दिशेने निघाले.

जन्मसंपादन करा

 • १५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर

मृत्यूसंपादन करा

 • १४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा)
 • १८०३ - तुसॉं ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.
 • १९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे
 • १९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड
 • १९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे
 • २००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन
 • २००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा
 • २०१४:फाळके पुरस्कारविजेते छायालेखक व्ही.के. मूर्ती

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • जागतिक आरोग्य दिन

बाह्य दुवेसंपादन कराएप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - (एप्रिल महिना)