दादर, मुंबई येथील राजा बढे चैक

राजा बढे (१९१२-१९७७) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते. त्यांनी पहिले नागपूर येथे कवी म्हणुन प्रसिद्धी मिळवली. नंतर ते मुंबई येथे राहायला गेले.त्यांनी काही काळ आॅल ईंडिया रेडियो येथे काम केले.

त्यांनी शिवाजी राजावर एक चित्रपट निर्माण केला.

राजा बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड करण्यात आली. जेव्हा 'प्रकाश पिक्चर्स' सावरकरांकडे 'राम-राज्य' चित्रपटासाठी गाणी लिहीण्याची मागणी करायला गेले, तर सावरकरांने बढेंचं नाव सुचविले.

त्यांचा अकाली मृत्यू दिल्ली येथे झाला.त्यांनी कधी विवाह केला नाही.

मुंबईतील प्रसिद्ध राजा बढे चौक त्यांच्याच नावावर आहे.त्यांचे सर्वाधिक नाव 'गाथा सप्तशती' (महाराष्ट्राचा प्राचीन राजा हल सातवाहान ह्याच्या काव्यांचे संकलन) ह्यातील प्रमुख योगदानासाठी झाले.

बढे यांनी लिहिलेली काही गाणी खालील प्रमाणे आहेत:

  • जय जय महाराष्ट्र् माझा, गायक शाहीर साबळे
  • हसतेस अशी का मनी, गायिका लता मंगेशकर
  • चांदने शिंपीत जशी, संगीतकार ह्र्दयनाथ मंगेशकर
  • सुजन हो परीसा राम-कथा, 'राम राज्य' (१९४३) ह्या चित्रपटातील गीत

बाह्य दुवेसंपादन करा