रवींद्र पिंगे (मार्च २३, इ.स. १९२६[१] - ऑक्टोबर १७, इ.स. २००८) हे मराठी लेखक होते.

रवींद्र पिंगे
जन्म मार्च १३, इ.स. १९२६ [१]
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑक्टोबर १७, इ.स. २००८
विलेपार्ले, मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार व्यक्तिचित्रण, ललीतलेखन, प्रवासवर्णन, साहित्य परिचय
प्रसिद्ध साहित्यकृती सर्वोत्तम रवींद्र पिंगे, शतपावली,पश्चिमेचे पुत्र, आनंदाच्या दाही दिशा, देवाघरचा पाऊस
वडील रामचंद्र परशुराम पिंगे
आई सुभद्राबाई रामचंद्र पिंगे
अपत्ये सांबप्रसाद पिंगे, चित्रा वाघ
पुरस्कार दमाणी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे 3 पुरस्कार, राष्ट्रीय कथा पुरस्कार, कोकण साहित्यभूषण व इतर अनेक पुरस्कार

रवींद्र पिंग्यांचा जन्म मार्च २३, इ.स. १९२६ रोजी मुंबईत झाला. [कोकणातील] राजापूर तालुक्यातील उपळे हे पिंगे घराण्याचे मूळ गाव. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले.अर्थशास्त्र विषय घेऊन बी ए झाल्यावर त्यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केली. ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात मराठी विभागात निर्माता पदावर होते. त्यांची सुमारे 40 पुस्तके प्रसिद्ध आहेत. घाटदार, अल्पाक्षरी, संदर्भसंपन्न लेखन हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते. ‘माणूस’ साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले सुमारे अडीचशे ललितलेख वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललित लेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती आहे.‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’व 'निवडक रवींद्र पिंगे' हे त्यांच्या निवडक लेखांचे संग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

प्रकाशित साहित्य

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. ८१.
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
परशुरामाची सावली कादंबरी १९६७
प्राजक्ताची फांदी कथा
सुखाचं फूल कथा उत्कर्ष प्रकाशन १९८१
बकुळफुले -फुले मोहाची ललित लेखसंग्रह उत्कर्ष प्रकाशन १९८४
मुंबईचं फुलपाखरू ललित लेखसंग्रह विश्वसखा प्रकाशन १९८१
आनंदाच्या दाही दिशा प्रवासवर्णन
पश्चिमेचे पुत्र ।। पाश्चात्य साहित्य परिचय
आनंदव्रत प्रवासवर्णन
दुसरी पौर्णिमा प्रवासवर्णन
शतपावली व्यक्तिचित्रण राजहंस प्रकाशन १९७४
देवाघरचा पाऊस व्यक्तिचित्रण उत्कर्ष प्रकाशन १९७५
मोकळं आकाश ललित लेखसंग्रह १९७८
दिवे-लामणदिवे व्यक्तिचित्रण
अत्तर आणि गुलाबपाणी व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन १९९७
पिंपळपान पाश्चात्य साहित्य परिचय
आनंद पर्व ललित लेखसंग्रह उत्कर्ष प्रकाशन १९९४
प्रकाशाची खिडकी पाश्चात्य साहित्य परिचय
तुषार आणि तारे व्यक्तिचित्रण
सोनेरी सूर्यफुलं व्यक्तिचित्रण नवचैतन्य प्रकाशन २००५
शकुनाचं पान ललित लेखसंग्रह चंद्रकला प्रकाशन २००५
समाधानाचं सरोवर ललित लेखसंग्रह निहारा प्रकाशन २००७
मानवंदना मानपत्रे
काही चंदेरी काही सोनेरी पाश्चात्य साहित्य परिचय ज्ञानदा पब्लिकेशन १९९७
चिरेबंदी ललित लेखसंग्रह अनुभव प्रकाशन २००१
सुखाचे पदर ललित लेखसंग्रह
सर्वोत्तम रवींद्र पिंगे निवडक लेख राजहंस प्रकाशन २००७
निवडक रवींद्र पिंगे निवडक लेख