एप्रिल १२
दिनांक
एप्रिल १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०२ वा किंवा लीप वर्षात १०३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
- १६०६ - ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट पिलोची कत्तल - जनरल नेथन बेडफोर्ड फॉरेस्टच्या नेतृत्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.
- १८७७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.
विसावे शतकसंपादन करा
- १९३५ - प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
- १९४५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
- १९४६ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१ - सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
- १९६७ - कैलाशनाथ वांछू भारताचे १०वे सरन्यायाधीश झाले.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.
- १९८० - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.
- १९८१ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.
- १९९४ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
- १९९७ पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले.
- १९९८ - स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एकविसावे शतकसंपादन करा
- २००१ : इंडोनेशियात ८.५ आणि ८.२ रिश्टर क्षमतेचे लागोपाठ दोन भूकंप
- २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
- २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.
- २०१७- विरार लोकलला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 एप्रिल, 1867 रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी 5.30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.
जन्मसंपादन करा
- ४९९ - महावीर, जैन धर्मसंस्थापक.
- १४८२ - मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग
- १८७१: वासुदेव गोविंद आपटे, लेखक, भाषांतरकार व संपादक
- १९०२ - लुई बील, नेदरलॅंड्सचे पंतप्रधान.
- १९१० - पुरुषोत्तम भास्कर भावे, मराठी साहित्यिक
- १९१४ - कृष्ण गंगाधर दीक्षित, संवाद व गीतलेखक
- १९१७ - विनू मांकड - सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज
- १९४३ - सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री
- १९८१ - तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यूसंपादन करा
- २३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.
- २३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.
- ३५२ - पोप ज्युलियस पहिला.
- १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
- १८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर
- १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य
- १९१२: अमेरिकन रेड क्रॉसच्या स्थापक कारा बार्टन
- १९४५ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९८० - विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २००१: NASSCOMचे अध्यक्ष देवांग मेहता
- २००१: स्माईलीचे जनक हार्वे बॉल
- २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ
- २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार
- २०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - (एप्रिल महिना)