पनॉम पेन

कंबोडिया देशाची राजधानी


पनॉम पेन (ख्मेर: ភ្នំពេញ) ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १४३४ साली स्थापन झालेले हे शहर कंबोडियाच्या मध्य-दक्षिण भागात मिकांग नदीच्या काठावर वसले असून ते कंबोडियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.

पनॉम पेन
ភ្នំពេញ
कंबोडिया देशाची राजधानी


पनॉम पेन is located in कंबोडिया
पनॉम पेन
पनॉम पेन
पनॉम पेनचे कंबोडियामधील स्थान

गुणक: 11°33′N 104°55′E / 11.550°N 104.917°E / 11.550; 104.917

देश कंबोडिया ध्वज कंबोडिया
प्रांत पनॉम पेन
स्थापना वर्ष इ.स. १४३४
क्षेत्रफळ ६७८.५ चौ. किमी (२६२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २२,३४,५६६
  - घनता ३,२९३.६ /चौ. किमी (८,५३० /चौ. मैल)
phnompenh.gov.kh

फ्रेंचांनी बांधलेले पनॉम पेन शहर एके काळी आशियाचा मोती ह्या नावाने ओळखले जात असे. येथील ऐतिहासिक इमारती फ्रेंच वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. सध्या पनॉम पेन्हची लोकसंख्या सुमारे २२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.४ कोटी इतकी आहे. पनॉम पेन हे कंबोडियामधील व जगातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: