फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

(फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यू यॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट
FDRoosevelt.png

सही फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टयांची सही

परिचयसंपादन करा

इ.स. १९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी पोलिओग्रस्त झाल्यावरही ते राजकारणात सतत व्यस्त राहिले.फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा जन्म १८८२ मध्ये अमेरिकेतील न्यूयोर्क राज्यात झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले. १९३२ मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली व त्यानंतर सलग चारवेळा जिंकून इतिहास रचला. चौथ्या वेळेस अध्यक्षपदी निवडून आल्यावर तो कालावधी पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.

कामगिरीसंपादन करा

१९२९ च्या महामंदी नंतर त्यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले तसेच अत्यंत खडतर अश्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते. याकाळातील त्यांच्या कणखर नेतृत्वाने अमे‍रिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आकार आला. तसेच दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रभावी कामगीरी बजावली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात रुझवेल्ट नसले तरी अमेरिका एक प्रभावी सत्ता होण्यास रुझवेल्ट यांचे मोलाचे कार्य होते.

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.