ऑलिव्हर क्रॉमवेल

इंग्लिश राजकारणी


ऑलिव्हर क्रॉमवेल (एप्रिल २५, इ.स. १५९९:हंटिंग्डन, इंग्लंड - सप्टेंबर ३, इ.स. १६५८:लंडन)हा इंग्लिश राजकारणी व सेनापती होता.

ऑलिव्हर क्रॉमवेल

त्याने इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याविरुद्धच्या क्रांतिचे नेतृत्व केले व जिंकल्यावर इंग्लंड, स्कॉटलंडआयर्लंडचा रक्षक म्हणुन डिसेंबर १६, इ.स. १६५३ ते मृत्युपर्यंत राज्य केले.

क्रॉमवेलने कॅम्ब्रिज येथील सिडनी ससेक्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले परंतु पदवी मिळवण्याच्या आधीच त्याने शिक्षण सोडले. इंग्लिश गृहयुद्धाच्या सुरुवातीस क्रॉमवेलने खाजगी घोडदल उभारले व इंग्लिश संसदेकडून लढाईत भाग घेतला. मार्स्टन मूरच्या लढाईतील विजयाने त्याचे सेनापती म्हणून वजन वाढले. चार्ल्स हरल्यावर त्याने राज्यसूत्रे हाती घेतली.

वयाच्या ५९व्या वर्षी क्रॉमवेल मलेरियाने मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा रिचर्ड क्रॉमवेल राज्यकर्ता झाला परंतु दोन वर्षांनी त्याला पदच्युत करून चार्ल्स पहिल्याचा मुलगा चार्ल्स दुसरा इंग्लंडचा राजा झाला. त्यानंतर क्रॉमवेलचे दफन केलेले शव काढून त्याची विटंबना करण्यात आली व शिरच्छेद करून मुंडके लंडनच्या रस्त्यांवर मिरवण्यात आले.