घूर्णवात
(टोर्नेडो या पानावरून पुनर्निर्देशित)
जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळसदृश संरचनेस घूर्णवात किंवा टोरनॅडो म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो.
घूर्णवात लहान किंवा मोठे असले, तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी ताशी १७५ किलोमीटरपेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत होत असले तरी, अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत