जानेवारी १९
दिनांक
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९ वा किंवा लीप वर्षात १९ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४१९ - इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याने नॉर्मंडीची राजधानी रुआ जिंकून नॉर्मंडीचा पूर्ण पाडाव केला.
सोळावे शतक
संपादनसतरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८०६ - इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा ताबा घेतला.
- १८३९ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडन जिंकले आणि भारत-इंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला.
- १८३९ - अमेरिकन यादवी युद्ध - मिल स्प्रिंग्सच्या लढाईत उत्तरेचा विजय.
विसावे शतक
संपादन- १९१५ - पहिले महायुद्ध - जर्मन झेपेलिननी ब्रिटनच्या ग्रेट यारमथ आणि किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ.
- १९१८ - फिनिश गृहयुद्ध - लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - ब्रिटनने एरिट्रिया वर हल्ला केला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमार वर हल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रशियाने पोलंडमधील लोड्झ शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरुवातीला लोकसंख्या - २,३०,०००. या दिवशीची लोकसंख्या - ९००.
- १९४६ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले.
- १९४९ - पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
- १९५४ - कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
- १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले.
- १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
- १९६८ - डॉ. क्रिस्टोफर बर्नार्ड यांनी पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया केली.
- १९७७ - मायामी, फ्लोरिडात आत्तापर्यंतचा एकमेव हिमवर्षाव.
- १९८६ - (c) Brain नावाचा पहिला संगणक विषाणु पसरण्यास सुरुवात झाली.
- १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉं यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - स्लोव्हेकियन वायु सेनेचे ए.एन. २४ प्रकारचे विमान हंगेरीमध्ये कोसळले.
- २००६ - नासाने न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित केले.
- २००६ - जेट एरवेझने एर सहारा विकत घेतले व भारतातील सगळ्यात मोठी विमान कंपनी झाली.
- २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.
जन्म
संपादन- ३९९ - पुल्केरिया, बायझेन्टाईन सम्राज्ञी.
- १७३६ - जेम्स वॅट, स्कॉटिश शास्त्रज्ञ संशोधक.
- १८०७ - रॉबर्ट ई. ली, अमेरिकन कॉन्फेडरेट सेनापती.
- १८०९ - एडगर ऍलन पो, अमेरिकन लेखक.
- १८१३ - सर हेन्री बेसेमेर, इंग्लिश संशोधक.
- १८६८ - बॉब मॅकलिओड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८६ - रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व, हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक.
- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक.
- १८९८ - विष्णू सखाराम तथा वि.स. खांडेकर, मराठी साहित्यिक.
- १९०६ - विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.त्यांनी २२ चित्रपटांतून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.
- १९२२ - आर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३० - जॉन वाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - झिया उर रहमान, बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
- १९६९ - महमूद हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी.
- १९६० - रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक.
- १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी.
- २००० - मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम, उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर.
- २००४ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - (जानेवारी महिना)