जानेवारी ८
दिनांक
<< | जानेवारी २०२१ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८ वा किंवा लीप वर्षात ८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
- १२९७ - फ्रांस्वा ग्रिमाल्डीच्या सैन्याने मोनॅको काबीज केले. ग्रिमाल्डी घराणे येथपासून २१व्या शतकापर्यंत मोनॅकोचे शासक होते.
पंधरावे शतकसंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
- १८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
- १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
विसावे शतकसंपादन करा
- १९०४ - पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली.
- १९०८ - बालवीर चळवळीस प्रारंभ
- १९४० - दुसरे महायुद्ध–ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
- १९४७ - जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
- १९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते.
- १९६३: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
- १९७१ : 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली' अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.
एकविसावे शतकसंपादन करा
- २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
- २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
- २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
- २००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्मसंपादन करा
- १८५१ - बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते, कृषी, आरोग्य आणि भारतीय देशी कारागिरीवर लिहिणारे मराठी लेखक.
- १९०१ - यशवंत श्रीधर परांजपे, युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार
- १९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - डॉ. मनोहर गोपाळ गुप्ते, समाजसेवक.
- १९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.
- १९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
- १९२५ - राकेश मोहन, हिंदी नाटककार
- १९२६ - केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक
- १९२९ - सईद जाफरी, हिंदी व इंग्लिश अभिनेता.
- १९३६ - ज्योतिंद्रनाथ दिक्षीत, भारताचे परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
- १९३९ - नंदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
- १९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
- १९४७ - इेविहड बॉविए
- १९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - केनी ॲंथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
- १९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ४८२ - संत सेव्हेर्नियस.
- ११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
- ११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा.
- ११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा.
- १३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक.
- १६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८४ - केशव चंद्र सेन, ब्राम्हो समाजचे नेते.
- १९३४- अध्यात्मविषयक ग्रंथांचे लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर
- १९४१ - लॉर्ड बेडन-पॉवेल, स्काउट चळवळीचे स्थापक.
- १९६६ - बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक
- १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली
- १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत.गांधीवादी कार्यकर्तो सर्वोद्यी विचारवंत आचार्य
- १९७३ - ना.भि. परुळेकर, दैनिक सकाळचे स्थापक
- १९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
- १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय
- १९९१ - भास्कर धोंडो कर्वे, कर्वे समाज संस्थेचे संस्थापक.
- १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे, आनंद मासिकाचे संपादक.
- १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती
- १९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी.
- १९९६ - फ्रांस्वा मित्तरॉॅं, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- २००३ - राजभाऊ एस. माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते.
- २०१८-आमीर खानच्या 'लगान' चित्रपट ईश्वर काकांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे दीर्घ आजारने जयपूर येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
संदर्भसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |