मोनॅको हा युरोपातील एक 'नगर-देश' आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

मोनॅको
Principauté de Monaco
मोनॅकोचे संस्थान
मोनॅकोचा ध्वज मोनॅकोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Deo Juvante" (लॅटिन)
देवाच्या मदतीने
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे स्थान
मोनॅकोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मोनॅको
सर्वात मोठे शहर मोन्टे कार्लो
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख आल्बर्ट दुसरा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस इ.स. १२९७ 
 - प्रजासत्ताक दिन इ.स. १९११ 
क्षेत्रफळ
 - एकूण १.९५ किमी (२३२वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २०१० ३०,५८६[१] (२११वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५,१४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८८८ अब्ज[२][३] अमेरिकन डॉलर (१५३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६५,९२८ अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९४६ (उच्च) (१६वा) (२००३)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ MC
आंतरजाल प्रत्यय .mc
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३११
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

केवळ २.०२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. मोनॅकोच्या रहिवाशांना वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. ह्या कारणास्तव येथे अनेक धनाढ्य उद्योगपती व खेळाडू स्थायिक झाले आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ मोनॅको, द वर्ल्ड फॅक्टबूक, सी.आय.ए. जून ७, इ.स. २०१० रोजी पाहिले.
  2. ^ Produit Intérieur Brut (P.I.B.),[मृत दुवा] Département des Finances et de l’Economie, Principauté de Monaco. Retrieved June 7, 2010.
  3. ^ World Development Indicators, जागतिक बँक. नोंद: "PPP conversion factor, GDP (LCU per international $)" and "Official exchange rate (LCU per US$, period average)" for France were used.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 43°43′58″N 7°25′11″E / 43.73278°N 7.41972°E / 43.73278; 7.41972