वॉशिंग्टन डी.सी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जागतिक बॅंकेच्या मुख्यालयाची इमारत.

जागतिक बॅंक (इंग्लिश: World Bank, वर्ल्ड बॅंक) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४5 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती (इंग्लिश: Bretton Woods System) समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देशअविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.

गरीबी दूर करण्यासाठी ही बॅंक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.

जागतिक बॅंकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :

शिक्षणासाठी जागतिक बॅंक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.

भारतासहित अनेक देशांना या बॅंकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.

इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बॅंकेने मेक्सिकोइंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.

विरोधी बाजूसंपादन करा

याच वेळी बॅंकेचे विरोधक असेही म्हणतात की बॅंकेची काही लपवलेली उद्दीष्टेही आहेत. जसे की दुसऱ्या महायुद्धा नंतर साम्राज्य लयाला जात चाललेल्या इंग्लंड ला नवीन आर्थीक साम्राज्य उभारण्यासाठी या बॅंकेचा उपयोग करून घेतला आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ जोसेफ स्तिगलित्झ (इंग्रजी:Joseph E. Stiglitz) यानीही इ.स. १९९९ मध्ये बॅंकेच्या उद्दीष्टांशी सुसंगत नसलेल्या धोरणांवर टीका केली होती.

बाह्य दुवेसंपादन करा

समर्थक बाह्य दुवेसंपादन करा

विरोधी बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.