शोभा डे :(७ जानेवारी, इ.स. १९४८ - )

शोभा डे
Shobhaa De Writer.jpg
Shobhaa De, at 'Meet The Author' programm conducted by sharjha International Book Fair 2011

शोभा डे यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात राजाध्यक्ष कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या कारकीर्द ची सुरवात झीनत अमान यांच्यासोबात मॉडेलिंगच्या क्षेत्रात केली. या भारतीय लेखक आणि स्तंभलेखक आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.

जीवनसंपादन करा

मूळ नाव शोभा राजाध्यक्ष असलेल्या डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली.पती दिलीप डे आणि सहा मुलांसह त्या कफ परेड, मुंबई येथे राहतात.

लेखनसंपादन करा

स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे.