फिनएअर (फिनिश: Finnair Oyj, स्वीडिश: Finnair Abp) ही फिनलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ सालापासून कार्यामध्ये असलेली फिनएअर ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी विमानकंपनी आहे.

फिनएअर
आय.ए.टी.ए.
AY
आय.सी.ए.ओ.
FIN
कॉलसाईन
FINNAIR
स्थापना १ नोव्हेंबर १९२३
हब हेलसिंकी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर फिनएअर प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ५९
ब्रीदवाक्य Designed for you
मुख्यालय व्हंटा, फिनलंड
संकेतस्थळ http://finnair.com
फिनएअरचे जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एअरबस ए३४० विमान

फिनएअरचे मुख्यालय हेलसिंकीच्या व्हंटा ह्या उपनगरात असून हेलसिंकी विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

फिनलंड सरकार प्रमुख भागधारक (५५.८%) असलेली फिनएर आणि त्याच्या उपकंपन्यांचा फिनलंडमधील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी सेवेवर मोठा प्रभाव आहे. २०१५ मध्ये या कंपनीची सेवा युरोपमधील ६० देश, आशिया खंडातील १३ देश आणि उत्तर अमेरिका खंडातील ४ देशातील ठिकाणी १ कोटी प्रवाशांनी वापरली. जानेवारी २०१६ मध्ये या कंपनीचे ४,८१७ कर्मचारी होते.[]

फिनएरला १९६३ पासून अपघातात विमान किंवा जीवितहानी झालेली नाही.[]

इतिहास

संपादन

फिनएरची स्थापना १ नोव्हेंबर, १९२३ रोजी एरो ली या नावाने झाली. सुरुवातीस या कंपनीच्या उड्डाणांचा संकेत एवाय होता. हा संकेत एरो इहितो (फिनिश भाषेत विमानकंपनी) वरून घेतला गेला होता. फिनएरचा स्थापक बृनो लुकंदर त्याआधी एरोनॉट ही एस्टोनियामधील विमानकंपनी चालवित असे.

दुसरे महायुद्ध

संपादन

दुसऱ्या महायुद्धात हेलसिंकीवर झालेल्या हल्ल्याने फिनएर अडचणीत आली होती. फिनलंडच्या वायुसेनेने १९३९-४० च्या हिवाळ्यात फिनएरची अर्धीअधिक विमाने हस्तगत केली व मोठ्या संख्येने लहान मुलांना स्वीडनमध्ये स्थलांतरित केले.

युद्धोत्तर

संपादन

१९४६मध्ये फिनिश सरकारने डग्लस डीसी-३ प्रकारची विमाने खरेदी करण्यासाठी समभाग विकले व फिनएरच्या मार्गांची व्याप्ती वाढवली. १९५३मध्ये फिनएरने कॉन्व्हेर-४४० प्रकारची विमाने वापरून लंडनपर्यंतची सेवा सुरू केली.

सहाय्यक विमान कंपनी

संपादन

फिन एर कार्गो ओवाय आणि फिन एर कार्गो टर्मिनल या दोन फिन एरच्या सहाय्यक कंपनी की ज्या मालवाहतुकीचे काम पहातात. यां दोन्ही एरलाइनची कार्यालये हेल्शिंकी विमान तळावर आहेत. सध्या फिनएर त्यांची स्वताःची विमाने मालवहातुकीसाठी वापरतात.

फिन एरची हेल्शिंकी एर पोर्ट, ब्रुसेल्स एरपोर्ट,लंडन हिथ्रो एर पोर्ट ही मालवाहतुकीची तीन केंद्रे आहेत.

नोर्दिक प्रादेशिक एयरलाइन

संपादन

ही एक फिनएरची सहाय्यक विमान कंपनी आहे. फिनएरचीच ATR-७२-५०० आणि एम्ब्रायर इ१९० ही विमाने भाड्याने घेऊन ही एर वापर करते. या सर्व विमानाची छबी फिनएरचीच आहे. ही एरलाइन २० ऑक्टोबर २०११ रोजी Flybe आणि फिनएर हा एकत्रित करार (जाइंट वेंचर) होऊन चालू झाली. १ मे २०१५ पासून फिनएरचे विमान नियमांनुसार ही विमान कंपनी चालू आहे.

कंपनी आराखडा

संपादन

विमान छबी

संपादन

डिसेंबर २०१० मध्ये या एरलाइन ने विमानांची छबी बदलली. विमानांच्या मुख्य भागावर ठळक आणि मोठ्या अक्षरात नाव कोरले. इंजींनाना सफेद रंग दिला. शेपटीचे बाजूस सफेद रंगात नीळा लोगो ठेवला. शेपटीवरील पृथ्वीगोल हटविला.

विमान सेवक पोषाख

संपादन

फिनएरचे नियमांनुसार सेवकांची स्थिति आहे. केबिन मधील सर्वसाधारण सेवकाला खांद्यावर एक पट्टी, जे सेवक सीनियर आहेत, त्यांना परसर हुद्दा आहे आणि हाँग काँग,सिंगापूर आणि स्पेन कडे जाणाऱ्या विमानात सेवा देतात त्यांना दोन पट्ट्या, व मुख्य परसरला तीन पट्ट्या आहेत. शिवाय स्त्री परसरला तिच्या ड्रेस किंवा ब्लाऊज वर सफेद उभी पट्टी आहे. फिनएरचे सेवकांनी विमान उड्डाण आणि लॅंडींगचे वेळी सुरक्षा म्हणून मोजे घालण्याचे बंधन आहे.

विमान गंतव्य स्थानक

संपादन

फिनएर एशिया, युरोप, उत्तर अमेरिका या खंडातील ३७ देशातील ११० ठिकाणी त्यांचे हेल्शिंकी या मुख्य केंद्रातून विमान सेवा देते.[]

कायदेशीर भागीदारी करार

संपादन

फिनएरने खालील विमान कंपनीशी भागीदारी करार केलेले आहेत.

  • एरोफ्लोट
  • एर बर्लिन
  • एर चायना
  • एर फ्रांस
  • अमेरिकन एर लाइन्स
  • बँकॉक एरवेझ
  • बेलविय
  • ब्राथेंस रिजिनल एरवेझ
  • ब्रिटिश एरवेझ
  • काथे पॅसिफिक
  • झेक एरलाइन्स
  • फ्लायबे
  • इबेरीय
  • इकेलंड एर
  • जपान एरलाइन्स
  • जेटस्टार एशिया एरवेझ
  • मलेशिया एरलाइन्स
  • नेक्स्टजेट
  • कांटास
  • कतार एरवेझ
  • श्रीलंकन एरलाइन्स
  • TAP पोर्तुगाल
  • व्हिएतनाम एरलाइन्स

जे नियमित विमान प्रवाशी आहेत त्यांना त्या त्या विमान वर्गवातील प्रवासासाठी गुण दिले जातात आणि त्यांचे एकत्रीकरण करून त्यांची स्वर्ण, रजत, रौप्य वर्गवारीत गणना केली जाते. अशा प्रवाशांना पुढील प्रवासात स्वागत कक्षात प्राधान्य दिले जाते. शिवाय करारबद्द इतर विमानात देखील त्यांना प्राधान्य दिले जाते. विविध हॉटेलमधील सेवेत तसेच वाहनात देखील प्राधान्य दिले जाते. खानपान व्यवस्थाही विमानात तसेच विमान तळावर समाधानकारक ठेवलेली आहे.

विमानात एलसीडी विडियो मॉनिटर, त्यात मूवीज, व्यवस्था ठेवलेली आहे. दैनिक, साप्ताहिक,या सुविधाही आहेत.[]

बक्षीस (Awards)

संपादन

सन २००९ मध्ये स्कायट्रक्स जागतिक एर लाइन अवॉर्ड कडून ४-स्टार लाइन अवॉर्ड प्राप्त झाला.[] सन २०१० ते २०१६ पर्यंत सतत प्रत्येक वर्षी उत्तर युरोपची बेस्ट एर लाइन आणि बेस्ट यूरोपियन एर लाइन हे अवॉर्ड अनुक्रमे TTG वार्षिक प्रवाशी अवॉर्ड आणि AFTA राष्ट्रीय प्रवाशी उध्योग अवॉर्ड यांचे कडून प्राप्त झाले. सन २०१३ मध्ये AFTA राष्ट्रीय प्रवाशी व्यवसाय अवॉर्ड कडून बेस्ट इंटरनॅशनल एरलाइन- ऑफ लाइन कॅरियर आणि २०१६ मध्ये बेस्ट ट्रॅवल अवॉर्ड कडून बेस्ट एरलाइन व्यवसाय अवॉर्ड व जागतिक प्रवाशी अवॉर्ड कडून विमानातील खानपान व्यवस्था अवॉर्ड प्राप्त झाले.[]

अपघात

संपादन

सन १९४० मध्ये जेयु ५२ कलेवा एरलाइनचे विमान सोविएत एर फोर्स ने पाडले होते. तसेच सन १९६१ आणि १९६३ मध्ये डीसी-३ या विमानाचे अपघात होऊन जीवित हानी झाली होती.

संदर्भ

संपादन
  1. ^ "फायनांसिअल स्टेटमेंट 1 जानेवारी - 31 डिसेंबर 2015" (PDF).
  2. ^ "सेफ्टी रॅंकिंग 2014".
  3. ^ "फिन एयर - कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन". 2016-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-23 रोजी पाहिले.
  4. ^ "इन-फ्लायईट्स एंटरटेनमेंट ऑन फिनएअर फ्लायईट्स".
  5. ^ "दि वर्ल्ड'स टॉप 100 एअरलाईन इन 2016".
  6. ^ "फिन एयर सेलेक्टड ऍज बेस्ट एअरलाईन फॉर बीझीनेस क्लास ॲंड बेस्ट एअरलाईन फॉर इन-फ्लाइट कॅटरिंग इन चायना".

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: