एरबस ए३४० (इंग्लिश: Airbus A340) मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान २६१ ते ३८० प्रवाशांना ६,७०० ते ९,००० मैल (१०,८०० - १४,६०० कि.मी)पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एरबस ए-३३० या विमानासारखी आहे.

उदयोन्मुख लेख
हा लेख १० जून, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख
एरबस ए३४०

कॅथे पॅसिफिकचे एरबस ए-३४०-६००

प्रकार लांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, इटली
उत्पादक एरबस
पहिले उड्डाण ऑक्टोबर २४, इ.स. १९९१
समावेश मार्च, इ.स. १९९३
सद्यस्थिती प्रवासी सेवेत
मुख्य उपभोक्ता लुफ्तांझा, इबेरियन एरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक एरलाइन्स, साउथ आफ्रिकन एरवेझ
उत्पादित संख्या ३७४ (सप्टेंबर, इ.स. २०१०)
प्रति एककी किंमत ए-३४०-२००: ८ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर
ए-३४०-३००: २१ कोटी १८ लाख ते २२ कोटी ८० लाख अमेरिकन डॉलर
ए-३४०-५००: २३ कोटी ३० लाख ते २५ कोटी अमेरिकन डॉलर
ए-३४०-६००: २४ कोटी ५० लाख ते २६ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर
उपप्रकार एरबस ए-३३०

ए ३४० चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ.स. १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर सीएफएम५६-५सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ किलोन्यूटन आहे. -५०० आणि -६०० वर रोल्स-रॉइस ट्रेंट ५०० प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना एरबस ए-३३०सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.[]

लुफ्तांझा आणि एर फ्रान्सने सर्वप्रथम ए३४० विमानांचा वापर मार्च १९९३मध्ये केला. ऑक्टोबर, इ.स. २०१०अखेर ३७९ प्रती विकल्या गेल्या आहेत. पैकी ३७४ विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी २१८ विमाने ए३४०-३०० उपप्रकाराची आहेत व लुफ्तांझाकडेच ५९ आहेत. ए३४०ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर इटॉप्सची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुक एकच अंतरापर्यंत समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही, म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांमुळे त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची बोईंग ७७७ सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए३४०ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे.

विकास

संपादन

पार्श्वभूमी

संपादन
 
लुफ्तांझा ए-३४०-६००मधील इकोनॉमी भाग

१९७० च्या दशकात एरबसने अमेरिकेतील बोईंगडग्लस या दोन प्रस्थापित विमानोत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एर बस ए-३००ची रचना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच ए३०० चे विविध प्रकार विकसित करून बोइंग व डग्लसशी टक्कर देण्याचा एरबसचा मनसूबा होता.[] पहिले विमान तयार होण्याआधीच एरबस अभियंत्यांनी त्याचे ९ वेगवेगळे भावी प्रकार तयार करण्याची शक्यता वर्तवली होती. यांना ए३००बी१-ए३००बी९ असे नामाभिधान होते.[] त्यानंतर इ.स. १९७३मध्ये दहावा प्रकार निश्चित करण्यात आला (ए३००बी१०) आणि त्याची रचना इतरांपेक्षा आधी करण्यात आली.[] या छोट्या आकाराच्या पण लांब पल्ल्याच्या उपप्रकाराचा पूर्ण विकास झाल्यावर याचे नामकरण एरबस ए३१० करून त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात आले. यानंतरचे एरबसने आपले लक्ष एक चालपट्टी असलेल्या प्रकारांवर केंद्रित केले. याचे फळ म्हणजे, एरबस ए३२०, पहिलेवहिले फ्लाय-बाय-वायर[मराठी शब्द सुचवा] प्रवासी विमान. याच सुमारास एरबसमधील जर्मन भागीदारांनी चार इंजिने असलेले मोठे विमान तयार करण्याचा आग्रह लावला होता. त्याऐवजी ए३२०कडे लक्ष दिल्याने एरबसच्या भागीदारांत तणाव निर्माण झालेला होता. ए३२० बोइंगच्या ७३७ आणि डग्लसच्या डीसी-९ प्रकारच्या विमानांशी स्पर्धेत उतरल्यावर एरबसने परत आपले लक्ष मोठ्या आकाराच्या विमानांकडे वळवले.

ए३१०वर आधारित ए३००बी११ची रचनादहा टनी इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून होती.[] यात १८० ते २०० प्रवाशांची बसण्याची सोय असून साधारण ६,००० nautical mile (११,००० किमी)चा पल्ला नियोजित होता. हे विमान बोईंगच्या ७०७ आणि डग्लसच्या डीसी-८ प्रकारच्या विमानांशी थेट स्पर्धेत असणार होते.[] या रचनेत एरबसच्या अभियंत्यांनी ए३००बी९मधील भाग आणण्यास सुरुवात केली. बी९ या ए३०० च्या मोठ्या आवृत्तीचा विकास एरबसने मंदगतीने सुरू ठेवला होता त्याला आता वेग आला. याची मुख्य कल्पना होती ती ए३००ची लांबी वाढवून त्याला त्यावेळ उपलब्ध असलेली सगळ्यात शक्तिमान टर्बोफॅन इंजिने लावण्याची.[] एरबसने हे विमान मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय गर्दीच्या मार्गांवर वापरले जाण्याचा अंदाज बांधला होता. याचा पल्ला आणि भारवहनक्षमता साधारण मॅकडोनेल डग्लस डीसी-१० आणि लॉकहीड ट्रायस्टार एल-१०११ इतकीच पण इंधनखर्च २५%[] ते ३८%[] पर्यंत कमी करण्याचा दावा एरबसने केला.

बी९ आणि बी११ या दोन्ही प्रकारांच्या विकासखर्चात बचत करण्यासाठी एरबसने दोन्ही विमानांना एकाच रचनेचे पंख आणि एरफ्रेम[मराठी शब्द सुचवा] देण्याचे ठरवले. यामुळे सुमारे ५ कोटी अमेरिकन डॉलरची बचत अपेक्षित होती.[] या आर्थिक बचतीशिवाय तांत्रिक फायदा असा होता की चार इंजिने असलेल्या बी११ च्या (नवीन नामाभिधान टीए११) चारपैकी बाहेरच्या बाजूच्या दोन इंजिनांच्या भाराने पंख आपोआप वाकून इंधनबचत वाढली तर दोन इंजिने असलेल्या बी९ चे (टीए९) पंख न वाकल्यामुळे क्रुझगती वाढली.

उपप्रकार

संपादन
 
ए३४० चे उपप्रकार

ए३४० चे चार उपप्रकार आहेत. ए३४०-२०० आणि -३०० इ.स. १९८७मध्ये घोषित करण्यात आले. -२०० उपप्रकाराचे पहिले उड्डाण मार्च, इ.स. १९९३मध्ये झाले. इ.स. १९९७मध्ये ए३४०-५०० आणि -६००ची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही उपप्रकार इ.स. २००२मध्ये प्रवासी सेवेत दाखल झाले. हे चारही उपप्रकार व्यावसायिक प्रवासी सेवेशिवाय खाजगी वापराकरतादेखील तयार केले जाऊ शकतात.

ए३४०-२००

संपादन
 
कतार एरवेजचे ए३४०-२००

ए३४०-२०० हे ए३४०चा पहिला उपप्रकार आहे. यात २६१ प्रवासी तीन वर्गांमध्ये ७,४४० nautical mile (१३,७८० किमी) इतक्या अंतरावर किंवा तीन वर्गांत २४० प्रवासी ८,००० nautical mile (१५,००० किमी) अंतरावर नेणे अपेक्षित आहे.[] पंखांची लांबी फ्युजलाझ[मराठी शब्द सुचवा](विमानगाभा)च्या लांबीपेक्षा जास्त असलेला हा एकमेव उपप्रकार आहे. याला चार सीएफएम५६-५सी४ इंजिने लावली असतात तसेच हनीवेल ३३१-३५० ऑक्झिलरी पॉवर युनिट[मराठी शब्द सुचवा](उपसाधन उर्जा केंद्र)ही असते.[] हे विमान दूर अंतरावरील शहरांदरम्यानच्या पण अतिगर्दी नसलेल्या मार्गांवर वापरले जाणे अपेक्षित आहे. याचा मुख्य प्रतिस्पर्धी बोइंग ७६७-४००ईआर हे विमान आहे.

३४०-२००चा अजून एक उपप्रकार ए३४०-२१३एक्स आहे. याचा पल्ला ८,००० समुद्री मैल असून उड्डाणभार २७५ टन आहे तसेच याची चाके -२००पेक्षा किंचित जास्त मजबूत आहेत. याचा उगम एरबसने ब्रुनेइच्या सुलतानासाठी बांधलेल्या एकमेव ए३४०-८००० या प्रकारच्या विमानात आहे. ब्रुनेइच्या सुलतानाने स्वतःसाठी खास असे विमान बनवून घेण्यासाठी आरबसला लक्षावधी डॉलर देऊ केले व ८,१०० समैल पल्ला असलेले व २७५ टन उड्डाणभार असलेले हे विमान बनविण्यात आले. प्रत्यक्षात सुलतानाने हे विमान कधीच वापरले नाही. जर्मनीत हॅंबुर्ग येथील विमानतळावर पडून राहिलेल्या या विमानाच्या रचनेवरून एरबसने -२१३एक्स हा उपप्रकार तयार केला व -२००ऐवजी -२१३एक्सचेच उत्पादन कायम केले.

ए३४०-२०० प्रकारचे विमान प्रवासी वाहतुकीशिवाय खाजगी वापरातदेखील आहे. रॉयल ब्रुनेई एरलाइन्स, कतार अमीरी फ्लाइट, इजिप्तचे सरकार, सौदी अरेबियाची वायुसेना, जॉर्डनचा राजा आणि फ्रान्सची वायुसेना या प्रकारचे विमान अव्यावसायिक तत्त्वावर वापरतात. याशिवाय कॅथे पॅसिफिक, फिलिपाईन एरलाइन्स आणि एर बर्बन या कंपन्यांनीसुद्धा हे विमान भाड्याने देण्यासाठी वापरले.

-८००० चे विकसन केल्यावर जुन्या -२०० प्रकारच्या विमानांनाही त्यातील सुखसोयी देण्यात आल्या व त्यांचा पल्ला ८,००० समुद्री मैलांचा केला गेला. यांचे ए३४०-२१३एक्स असे पुन्हा बारसे केले गेले.

मोठे पंख, चार इंजिने, त्यामानाने असलेली कमी क्षमता आणि नंतर विकायला आलेले ए३४०-३००मधील नवीन सुखसोयी, यांमुळे -२०० जास्त लोकप्रिय झाले नाही. या प्रकारची फक्त २८ विमाने तयार केली. पैकी बरीचशी आता खाजगी वापरात आहेत. साउथ आफ्रिकन एरवेझकडे सहा, रॉयल जॉर्डेनियनकडे पाच, एरोलिनियास आर्जेन्टिनासकडे चार, इजिप्त एरकडे तीन आणि कॉन्व्हियासाकडे असलेले एक, इतकीच विमाने आता व्यावसायिक प्रवासी सेवेत आहेत. या विमानाचे उत्पादन आता थांबवले गेले आहे.

ए३४०-३००

संपादन
 
लुफ्तांसाचे एरबस ए३४०-३०० टोरोंटो पियर्सन विमानळाच्या धावपट्टी २३ वर उतरण्याच्या तयारीत

ए३४०-३०० प्रकारच्या विमानात तीन वर्गांतून २९५ प्रवासी ६,७०० समुद्री मैल प्रवास करू शकतात. २५ ऑक्टोबर, १९९१ रोजी या प्रकारचे विमान पहिल्यांदा उडले. लुफ्तांसाएर फ्रांसने आपल्या ताफ्यात हे शामिल करून घेतले. याला -२०० या उपप्रकाराप्रमाणेच रोल्स रॉइस सीएफएम ५६-५सी प्रकारची चार विमाने असतात आणि हनिवेल ३३१-३५०(ए) हे एपीयू असते. बोईंग ७७७-२००ईआर प्रकारचे विमान ए३४०-३०० चे थेट स्पर्धक आहे.[१०] या प्रकारची एकूण २१८ विमाने विकली गेली.

-३००चा अजून एक उपप्रकार ए३४०-३००ई होता. याला अनेकदा चुकून ए-३४०-३००एक्स असे म्हणले जाते. याला सीएफएम५६-५सी४ इंजिने असून उड्डाणाचे वेळी त्याचे महत्तम वजन २७५ टन आहे. यातून २९५ प्रवासी ७,२०० ते ७,४०० समुद्री मैल प्रवास करू शकतात. साउथ आफ्रिकन एरवेझने या विमानाचा सर्वप्रथम वापर केला व नंतर एर मॉरिशसने २००६ पासून -३००ई विमाने वापरली. यांत अधिक विकसित इंजने व एव्हियॉनिक्स होते. लुफ्तांसाकडे या उपप्रकाराची ३० विमाने होती. एप्रिल २०१६ च्या सुमारास अंदाजे ३१५ -३०० विमाने वापरात होती.[११]

ए३४०-५००

संपादन

ए३४०-५०० प्रकारच्या विमानाने ११ फेब्रुवारी, २००२ रोजी पहिल्यांदा उड्डाण केले व त्याच वर्षी २ डिसेंबर रोजी त्यास प्रमाणित केले गेले. त्यावेळी हे विमान जगातील सर्वाधिक पल्ला असलेले विमान होते. यातून ३१३ प्रवासी तीन वर्गांतून ८,६५० समुद्री मैल (१६,०२० किमी) अंतर जाऊ शकतात. या विमानाची रचना -३०० सारखी असली तरी त्यात मोठे व महत्त्वाचे बदल होते. -५००ची लांबी ४.३मी जास्त होती तसेच पंख आणि शेपूट दोन्हीचा आकार मोठा होता. याची इंधनक्षमता -३००पेक्ष४ ५०%ने जास्त होती आणि क्रुझगतीही वाढवलेली होती. मागल्या चाकांतील मध्यभागात दोनऐवजी चार चाके होती. -५००ला रोल्स रॉइस ट्रेंट ५५३ प्रकारची चार टर्बोफॅन इंजिने व हनिवेल ३३१-६०० एपीयू असते.[१२] एर कॅनडा याचा पहिला उपभोक्ता होणार होता परंतु एर कॅनडाने जानेवारी २००३मध्ये दिवाळे काढल्यामुळे पहिली विमाने एमिरेट्सला देण्यात आली. एमिरेट्सने ही विमाने वापरून दुबई-न्यू यॉर्क थेट विमानसेवा सुरू केली.

सिंगापूर एरलाइन्सने या विमानाद्वारे सिंगापूर-न्यूअर्क ही जगातील सर्वाधिक पल्ल्याची विमानसेवा सुरू केली. सुरुवातीस यातून १८१ प्रवासी दोन वर्गांतून प्रवास करीत. नंतर याची रचना बदलून यात १०० बिझनेस क्लासचे प्रवासी असायचे. एसक्यू२१ हे उड्डाण न्यूअर्क ते सिंगापूर अंतर १८ तास ४५ मिनिटांत पार करायचे. यासाठी पश्चिमेस न जाता विमान न्यूअर्कपासून थेट उत्तरेस उत्तर ध्रुवाकडे जायचे व तेथून दक्षिणेस रशिया, मंगोलिया आणि चीन मार्गे सिंगापूरात उतरायचे. सिंगापूर ते न्यूअर्क अंतर हे विमान १८ तास ३० मिनिटांत पोचायचे. हे १५,३४४ किमी विनाथांबा उड्डाण २०१३पर्यंत चालू होते.

ए३४०-५००मध्ये मृतदेह ठेवण्याची सोय आहे. प्रवासातच असताना एखादा प्रवासी दगावला तर तो मृतदेह विशेष प्रकारच्या कपाटात ठेवला जाईल.[१३] एप्रिल २०१६ च्या सुमारास फक्त ए३४०-५०० प्रकारची फक्त ११ विमाने सेवारत होती.

ए३४०-६००

संपादन
 
लुफ्तांसाकडे सगळ्यात जास्त ए३४०-६०० विमाने आहेत. ही विमाने म्युन्शेन विमानतळावरून ये-जा करतात.

ए३४०-६००ची रचना बोईंग ७४७शी स्पर्धा करण्यासाठी केली गेली. यातून ३७९ प्रवासी तीन वर्गांतून १३,९०० किमी अंतर जाऊ शकतात. याशिवाय -६००मध्ये ७४७पेक्षा २५% अधिक सामान नेण्याची क्षमता आहे. सुधारलेल्या इंधनज्वलनामुळे -६००चा प्रतिमैल खर्चही कमी आहे. या विमानाचे पहिले उड्डाण २३ एप्रिल, २००१ रोजी झाले[१४] व पहिले व्यावसायिक उड्डाण व्हर्जिन अटलांटिकसाठी ऑगस्ट २००२मध्ये झाले.[१५][१६]

ए३४०-६०० हे -३००पेक्षा १२ मीटर आणि बोईंग ७४७पेक्षा ४ मीटर अधिक लांबीचे आहे. फक्त बोईंग ७४७-८ याच्यापेक्षा जास्त लांबीचे विमान आहे. -६००ला चार रोल्स रॉइस ट्रेंट ५५६ टर्बोफॅन इजिने आणि हनिवेल ३३१-६००ए एपीयू असतात.[१२] याच्या चाकांची रचना -५०० सारखीच असते. या विमानातील मागच्या भागातील स्वच्छतागृहे, कर्मचारी विश्रामकक्ष आणि खाद्यभांडार खालच्या भागात हलवून मुख्य मजल्यावर अधिक प्रवाशांना बसण्याची सोय केली जाऊ शकते.

-६००चा उपप्रकार ए३४०-६००एचजीडब्ल्यू हे अधिक भारवहन क्षमता असलेला आहे. याचे पहिले उड्डाण १८ नोव्हेंबर, २००५ रोजी झाले[१७] आणि प्रमाणीकरण १४ एप्रिल, २००६ रोजी झाले.[१८] या विमानातून ३८० टन अधिक वजन १४,३६० किमी पल्ल्यापर्यंत नेता येते. चार रोल्स रॉइस ट्रेंट ५६० इंजिने असलेले या विमानाची मागणी एमिरेट्सने २००३मध्ये केली[१९] परंतु नंतर ही विमाने घेण्याचे नाकारले. कतार एरवेझने अकरा विमानांच्या मागणीपैकी फक्त चार विकत घेतली.[२०][२१]

जुलै २०१५ च्या सुमारास सात विमानवाहतूक कंपन्यांकडे ए३४०-६०० विमाने होती.[२२] एप्रिल २०६मध्ये जगभरात ७७ ३४०-६०० विमाने वापरात होती.[२३] या विमानांची जागा आता एरबस ए३५० प्रकारची विमाने घेत आहेत.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "A340-600". Airbus (इंग्रजी भाषेत). 2018-09-24 रोजी पाहिले.
  2. ^ Wensveen, Dr John G. (2012-10-01). Air Transportation: A Management Perspective (इंग्रजी भाषेत). Ashgate Publishing, Ltd. p. 63. ISBN 9781409486824.
  3. ^ गन्स्टन, बिल. एरबस: द कंप्लीट स्टोरी (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ वॅग्नर, नॉरिस. एरबस ए३४० ॲंड ए३३० (इंग्लिश भाषेत). p. १८.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b c d वॅग्नर, नॉरिस. एरबस ए३४० अँड ए३३० (इंग्लिश भाषेत). p. २३.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ मेनार्ड, मिशेलिन. "टु सेव्ह फ्युएल, एरलाइन्स फाइंड नो स्पेक टू स्मॉल". न्यू यॉर्क टाइम्स (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ वॅग्नर, नॉरिस. एरबस ए३४० ॲंड ए३३० (इंग्लिश भाषेत). p. २२.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "ए३३०/अ३४० फॅमिली : ट्विन-अँड-फोर-इंजिन एफिशियन्सी" (इंग्लिश भाषेत). 2010-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "प्रॉडक्ट कॅटलॉग" (इंग्लिश भाषेत). 2011-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "Boeing: 777 way much better than A330". 8 December 2010.
  11. ^ planespotters.net - Airbus A340-300 Production List Archived 10 October 2016 at the Wayback Machine. retrieved 28 April 2016
  12. ^ a b "Product Catalog". 12 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 November 2010 रोजी पाहिले.
  13. ^ Andrew Clark (11 May 2004). "Airline's new fleet includes a cupboard for corpses". The Guardian. 11 May 2012 रोजी पाहिले.
  14. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Norris 2001 105 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  15. ^ "VIRGIN ATLANTIC'S A340-600 – THE LONGEST PLANE IN THE WORLD – TAKES ITS FIRST COMMERCIAL FLIGHT". Asiatraveltips.com. 1 August 2002. 3 December 2010 रोजी पाहिले.
  16. ^ "Virgin Atlantic's A340-600 – the Longest Plane in the World – Takes its First Commercial Flight". 5 August 2002. 27 November 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 December 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  17. ^ "New A340-600 takes to the skies". 18 November 2005. 19 May 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2006 रोजी पाहिले.
  18. ^ "Newly certified A340-600 brings 18% higher productivity". 14 April 2006. 16 June 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2006 रोजी पाहिले.
  19. ^ "Emirates orders 41 additional Airbus aircraft". 16 June 2003. 19 May 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2006 रोजी पाहिले.
  20. ^ "Qatar Airways First Airbus A340-600 Arrives in Doha". www.qatarairways.com
  21. ^ Wallace, James; Aerospace, P-I (29 November 2007). "First Boeing jet of many touches down in Qatar". Seattle Post-Intelligencer. 2 July 2011 रोजी पाहिले.
  22. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FI15 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  23. ^ planespotters.net - Airbus A340-600 Production List Archived 2022-09-20 at the Wayback Machine. retrieved 27 April 2016.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: