दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار دبي الدولي) (आहसंवि: DXB, आप्रविको: OMDB) हा संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील विमानतळ आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठा असलेला दुबई विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. एकूण प्रवाशांच्या संख्येबाबतीत व मालवाहतूकीबाबतीत दुबई विमानतळाचा जगात ६वा क्रमांक आहे. दुबई शहराच्या ४.७ किमी पूर्वेस अल गर्हूड भागामध्ये हा विमानतळ ७,२०० एकर क्षेत्रफळाचा. या विमानतळावर ३ टर्मिनल असून टर्मिनल क्र. ३ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी इमारत (अमेरिकेमधील पेंटॅगॉन खालोखाल) आहे. जानेवारी २०१५ अखेरीस दुबईमधून दर आठवड्याला १४० कंपन्यांची ८,००० विमाने उड्डाण करतात व २७० शहरांना विमानवाहतूक पुरवत. येथून एरबस कंपनीच्या एरबस ए३८० ह्या जंबोजेट विमानाची सर्वाधिक उड्डाणे होतात.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ مطار دبي الدولي | |||
---|---|---|---|
आहसंवि: DXB – आप्रविको: OMDB
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | दुबई सरकार | ||
कोण्या शहरास सेवा | दुबई | ||
स्थळ | दुबई, संयुक्त अरब अमिराती | ||
हब | एमिरेट्स फ्लायदुबई क्वांटास | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ६२ फू / १९ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 25°15′10″N 55°21′52″E / 25.25278°N 55.36444°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
12L/30R | 4,000 | डांबरी | |
12R/30L | 4,450 | डांबरी | |
सांख्यिकी (2014) | |||
प्रवासी | 7,16,75,636 | ||
विमान उड्डाणे | 4,05,750 | ||
मालवाहतूक (टनांमध्ये) | 23,67,574 | ||
स्रोत: संयुक्त अरब अमिराती Aeronautical Information Publication,[१] Airports Council International[२] |
९०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा दुबई विमानतळ दुबईच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान करतो. दुबईच्या एकूण जी.डी.पी.चा २७ टक्के वाटा या विमानतळाकरवी येतो. २०२० अखेरीस हा आकडा ३७.५ टक्क्यांवर पोचेल असा अंदाज आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनप्रवासी
संपादनसामानवाहतूक
संपादनअल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेख सुद्धा पहा.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ United Arab Emirates AIP Archived 2013-12-30 at the Wayback Machine. (login required)
- ^ "Preliminary 2012 World Airport Traffic and Rankings". Aci.aero. 2020-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Air India Express Adds New Delhi / Mumbai – UAE Service in S16". 15 February 2016 रोजी पाहिले.
- ^ "China Eastern schedules Qingdao – Dubai late-June 2019 launch". Routesonline.
- ^ Liu, Jim. "China Eastern adds Xi'An – Dubai service from late-August 2019". Routesonline. 15 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Drukair files Tokyo / Dubai schedule from Sep 2020". routesonline. 12 August 2019 रोजी पाहिले.
- ^ a b "Emirates Adds Yangon / Hanoi Service from August 2016". Airline Route. 25 February 2016. Retrieved 25 February 2016.
- ^ a b "Emirates Adds Yinchuan / Zhengzhou Service from May 2016". 14 December 2015. 14 December 2015 रोजी पाहिले.
- ^ JL (2015-09-21). "flydubai Proposes Dubai – Arar Service from June 2016". 2016-01-13 रोजी पाहिले.
- ^ http://www.exyuaviation.com/2016/03/flydubai-to-launch-podgorica-service-in.html
- ^ "GoAir expands International network in July/August 2019". routesonline.com. 16 July 2019.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |