तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फारसी: فرودگاه بینالمللی امام خمینی) (आहसंवि: IKA, आप्रविको: OIIE) हा इराण देशाच्या तेहरान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ बांधण्यापूर्वी मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तेहरानमधील प्रमुख विमानतळ होता परंतु तो वर्दळीचा बनल्यामुळे इराण सरकारने २००४ साली इमाम खोमेनी विमानतळ बांधून पूर्ण केला.
तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ فرودگاه بینالمللی امام خمینی | |||
---|---|---|---|
आहसंवि: IKA – आप्रविको: OIIE
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | तेहरान | ||
स्थळ | सुर्चिन, इराण | ||
हब | इराण एर इराण असेमान एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३३०५ फू / १००७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 35°24′58″N 51°9′8″E / 35.41611°N 51.15222°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
11L/29R | 13,772 | 4,198 | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | ६३,९३,६९५ | ||
मालवाहतूक (टनांमध्ये) | १,२०,९५४ | ||
विमाने | ४५,०६९ | ||
स्रोत: अधिकृत संकेतस्थळ[१] |
हा विमानतळ तेहरानच्या ३० किमी नैऋत्येस स्थित असून इराणची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी इराण एरचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-01-24 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत