अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कझाकस्तानमधील एक विमानतळ
अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कझाक: Toshkent Xalqaro Aeroporti, रशियन: Международный Аэропорт Алматы) (आहसंवि: ALA, आप्रविको: UAAA) हा मध्य आशियामधील कझाकस्तान देशाच्या अल्माटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. अल्माटीच्या १५ किमी ईशान्येस स्थित असलेला अल्माटी विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. कझाकस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी कझाकस्तान एरवेझचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ Халықаралық Алматы Әуежайы | |||
---|---|---|---|
आहसंवि: ALA – आप्रविको: UAAA
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | अल्माटी | ||
स्थळ | अल्माटी, कझाकस्तान | ||
हब | एर अस्ताना | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,२३४ फू / ६८१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 43°21′19″N 77°2′41″E / 43.35528°N 77.04472°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
05R/23L | १४,४३६ | ४,४०० | कॉंक्रीट |
05L/23R | १४,७६४ | ४,५०० | डांबरी |
सांख्यिकी (२०१२) | |||
प्रवासी | ४०,०३,००४ | ||
स्रोत: एआयपी कझाकस्तान[१] |
१९३५ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ सोव्हिएत राजवटीदरम्यान एक प्रमुख विमानतळ होता. तुपोलेव तू-१४४ ह्या जगातील पहिल्या स्वनातीत विमानाची एकमेव प्रवासीसेवा मॉस्को ते अल्माटी विमानतळादरम्यान चालू करण्यात आली होती.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-10-23 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत